क्षुल्लक खेळामुळे गायकाला गमवावा लागला जीव; ऐकणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली

गायकाच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना धक्काच बसला आहे. 

Updated: Nov 2, 2022, 08:05 AM IST
क्षुल्लक खेळामुळे गायकाला गमवावा लागला जीव; ऐकणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली title=

मुंबई : लोकप्रिय गायक सिद्धू मुसेवालाच्या निधनानंतर संगीत क्षेत्राला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. हॉलिवूड रॅपर टेकऑफची (Migos Takeoff) वयाच्या 28 व्या वर्षी गोळ्या घालून हत्या (Migos Takeoff shot dead) करण्यात आली आहे. अपघाताच्या वेळी, रॅपर टेकऑफ त्याच्या दोन सहकाऱ्यांसह ह्यूस्टनमध्ये गोलंदाजी करत होता. गोळीबारात त्याचे दोन्ही साथीदारही गंभीर जखमी झाले आहेत. टेकऑफचा जागीच मृत्यू झाला. त्याचे दोन्ही बॅंड मेंम्बर्स सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मिगोसचा तिसरा सदस्य रॅपर टेकऑफच्या मृत्यूनंतर, त्यांचे चाहते सोशल मीडियावर शोक करत आहेत. बॉक्सर ख्रिस उबँक्स ज्युनियर, रॅपरच्या मृत्यूला श्रद्धांजली वाहत, सोशल मीडियावर लिहिले, 'मला आठवतं की टेकऑफची नाळ जमिनीशी जोडलेली आहे. तो खूप चांगला माणूस होता. हे सगळं मी लिहित आहे यावर माझा विश्वासच बसत नाही. (Singer Migos Rapper Takeoff Shot Dead In Houston At 28) 

डाइस खेळत असताना भांडण झालं आणि कोणीतरी त्याच्यावर गोळी झाडली. रिपोर्ट्सनुसार, ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी 40-50 लोक उपस्थित होते. या घटनेचे एक फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये कुआवो दिसत आहे आणि काही लोक टेकऑफच्या आसपास उभे होते. या घटनेनंतर कुआवोनेही मदत मागितली होती.

टेकऑफचा जन्म 1994 मध्ये जॉर्जियामध्ये झाला होता. त्यानं ऑफसेट आणि कुआवोसोबत रॅपिंग सुरू केले. दोघांपैकी एक टेकऑफचा काका आणि दुसरा त्याचा चुलत भाऊ. पोलो क्लब असे त्यांच्या क्लबचे नाव आहे. या तिघांनी 2008 मध्ये क्लब सुरू केला. 2011 मध्ये तिघांनीही जुग सीझन रिलीज केला. त्यानंतर मिगोस मिक्सटेप बनवून इंडस्ट्रीत पदार्पण केले. टेकऑफनं आपल्या सहकाऱ्यांसोबत अनेक गाणी केली. जगभरातील लोकप्रिय मिगोसची गाणी चाहत्यांना आवडतात. या घटनेच्या काही वेळापूर्वी टेकऑफचे नवीन गाणे प्रदर्शित झाले होते.