Happy Birthday Shahrukh Khan : अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) वयाच्या 57 व्या वर्षी देखील प्रचंड फिट आणि उठावदार दिसतो. अनेक सिनेमांमधून चाहत्यांच्या मनात थेट प्रवेश करणाऱ्या शाहरुखच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील शाहरुखच्या चाहत्यांची (Shahrukh Khan fan) फार मोठी आहे. फक्त 90 च्या दशकातलेच नाही तर, आजचा लहान मुलगा देखील किंग खानला ओळखतो. आज अभिनेत्याचा वाढदिवस आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून घेवू त्याच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट... (shahrukh khan birthday party)
एक काळ असा होता जेव्हा शाहरुख मानेच्या दुखण्यामुळे त्रासला होता. डॉक्टरांनी अभिनेत्याला तात्काळ सर्जरी करण्यास सांगितलं. तेव्हा अभिनेत्याने एक पर्यायी मार्ग काढला. ज्यामुळे अभिनेत्याचा त्रास आणखी वाढला. (shahrukh khan business)
काही वर्षांपूर्वी अभिनेत्याने एका कॉलममध्ये लिहिलं की, त्याला मानेचा प्रचंड त्रास होत होता. तेव्हा डॉंक्टरांनी त्याला तात्काळ सर्जरी करण्याचा सल्ला दिला. पण लोकांनी शाहरुखला विविध मार्ग सांगितले. (srk next movie)
शाहरुख खानने अनेकांशी सल्लामसलत केल्यानंतर एक वर्ष वाट पाहण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दरम्यान त्याला 'पिन थेरपी'ची ( pin therapy) माहिती मिळाली. अभिनेत्यानं ही थेरपी करून घेण्याचं ठरवलं. यासाठी ज्या तज्ज्ञाची निवड करण्यात आली होती, ते प्रचंड प्रसिद्ध होते.
जेव्हा शाहरुख थेरपीसाठी पोहोचला तेव्हा तज्ज्ञांना अभिनेत्याला सांगितलं की, तुझे कपडे काढ. शाहरुखने सुरुवातीला त्याने शर्ट काढला. यानंतर शाहरुखने सर्व कपडे काढले आणि टेबलावर झोपला.
उपचारासाठी बेडवर झोपल्यानंतर थेरपी तज्ज्ञाने मानेऐवजी त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (private parts) पिन टोचली. अभिनेत्याने लिहिले की तो माझ्या आयुष्यातील सर्वात अपमानास्पद आणि वेदनादायक काळ होता. 'पिन थेरपी'मुळे शाहरुखच्या मानेचा त्रास कमी झाला नाही, पण त्याच्या वेदना अधिक वाढल्या.