पंजाब : पंजाबच्या प्रसिद्ध गायकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पंजाबी सिंगर आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसेवालावर अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात सिद्धूचा जागीच मृत्यू झाला. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात रविवारी ही धक्कादायक घटना घडली.
पंजाब सरकारने मूसेवालाची सुरक्षा काढून घेतल्यानंतर लगेच पुढच्या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पूर्ववैमनस्यातून हा धक्कादायक प्रकार झाल्याचा संशय आहे.
या सगळ्यात आता एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. ज्यामध्ये मूसवालाची एसयूव्ही दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिद्धू मूसेवालाची एसयूव्ही रस्त्यावरून जाताना दिसत आहे.
सिद्धच्या हत्येच्या काही मिनिटांपूर्वीचा हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये 2 कार मुसेवालाच्या एसयूव्हीचा पाठलाग करताना दिसत आहेत. यानंतर व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची बोलेरोही जाताना दिसते.
#WATCH | Punjab: A CCTV video shows two cars trailing Sidhu Moose Wala's vehicle moments before he was shot dead in Mansa district. pic.twitter.com/SsJag33XHb
— ANI (@ANI) May 30, 2022
मूसेवालावर रविवारी साडे पाच वाजण्याच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन गाड्यांनी त्याच्या पाठलाग करून त्याला रस्त्यात रोखलं आणि त्याच्यावर गोळीबार केल्याचं सांगण्यात आलं.
मूसेवालासोबत 4 ऐवजी 2 कमांडो होते. पंजाब सरकारने दोन कमांडोची सुरक्षा कमी केली होती. त्यानंतर हा हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मूसेवालाने 2 कमांडे आणि बुलेटप्रूफ गाडी नेली नव्हती. त्यामुळे याच संधीचा फायदा घेऊन अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला.