पुन्हा सिद्धार्थच्या आठवणीत शेहनाज गिल काहीसं असं करताना दिसली... पाहिलात का Video

अभिनेत्री आणि गायिका शेहनाज गिल जिला पंजाबची कतरिना कैफ म्हटले जाते, तिला आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही.

Updated: Oct 22, 2022, 09:49 PM IST
पुन्हा सिद्धार्थच्या आठवणीत शेहनाज गिल काहीसं असं करताना दिसली... पाहिलात का Video title=
Siddharths memory Shehnaz Gill was seen doing something like this nz

Mumbai : शेहनाज गिल ने तिच्या कॉमेडी अंदाजाने करोडो लोकांची मनं जिंकलीत. अभिनेत्री आणि गायिका शेहनाज गिल जिला पंजाबची कतरिना कैफ म्हटले जाते, तिला आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही. तिनं बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. खरं तर तिनं 'बिग बॉस 13' मध्ये एन्ट्री केल्यानंतर तिची लोकप्रियता खूप वाढली आहे. तुम्हाला माहितच असेल की, शेहनाज गिल एक अतिशय सुंदर अभिनेत्री तर आहेच पण सोबतच एक गोड गळ्याची गायिका आहे. (Siddharths memory Shehnaz Gill was seen doing something like this nz)

हे ही वाचा - जान्हवीने परिधान केला ट्रान्सपरंट ड्रेस, Video आला समोर... 

 

शेहनाज गिल सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच वायरल होतात. तिने आजच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या आवाजाची जादू पसरवत आहे. आज शहनाजने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओला आतापर्यंत 28 लाख लोकांनी पाहिलं तर 5 लाख 85 हजार 757 अधिक लोकांनी त्या व्हिडिओला लाईक्स केले.

 

शेहनाजच्या गाण्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शहनाज गिल 'मधूबाला' हे गाणे गाताना दिसत आहे. तिच्या आवाजात हे गाणं ऐकून चाहते खूश झालेत. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया केल्या. काही चाहते तर तिचे गाणं ऐकून भावूक ही झालेत.  अभिनेत्रीच्या व्हिडिओवर चाहते सतत कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले-  शेहनाज गिलचा सुंदर आवाज आणि शनिवारची सकाळ तर दुसरा चाहता कमेंट करतो की, 'जगाला सशक्त महिलांची गरज आहे'. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

हे ही वाचा - अजय देवगणच्या लेकीचा ग्लँमरस लुक, 'तो' VIDEO आला समोर  

तसे, शहनाज गिलने आपल्या आवाजातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही काळापूर्वी तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये शेहनाज 'जो भेजी थी दुआ' गाताना दिसली होती. हे गाणेही लोकांना खूप आवडले. शहनाजच्या गाण्याव्यतिरिक्त तिच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल सांगायचे झाल्यास, सध्या शेहनाज सलमान खानसोबत तिच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यूची तयारी करत आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.