Sidhharth Malhotra and Kiara Advani Wedding News : नाही नाही म्हणताना अखेर सिद्धार्थ- कियाराचं ठरलं; 'या' ठिकाणी, 'या' दिवशी घेणार सप्तपदी

Siddharth Malhotra आणि Kiara Advani यांचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, ते दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

Updated: Dec 31, 2022, 10:14 AM IST
Sidhharth Malhotra and Kiara Advani Wedding News : नाही नाही म्हणताना अखेर सिद्धार्थ- कियाराचं ठरलं; 'या' ठिकाणी, 'या' दिवशी घेणार सप्तपदी title=

Sidhharth Malhotra and Kiara Advani Wedding News : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) या दोघांचे लाखो चाहते आहेत. सिद्धार्थ आणि कियारा यांचे चाहते त्यांच्या लग्नाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आल्याचे आज  आपण म्हणू शकतो. सिद्धार्थ आणि कियारा दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. सिद्धार्थ आणि कियारा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.  

ईटाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ आणि कियारा 6 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. तर त्यांच्या लग्नाच्या आधीचे कार्यक्रम हे 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नात फक्त त्या दोघांचं कुटुंब आणि जवळचे मित्र हजेरी लावणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आणि कियारानं कतरिना आणि विकीप्रमाणे लग्नासाठी रॉयल पॅलेसची निवड केली आहे. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नात सुरक्षा राहणार आहे. तर त्यांच्या लग्नाच्या आधीचे आणि त्यानंतरचे सगळे कार्यक्रम हे पॅलेसमध्ये असतील. (Sidhharth Malhotra and Kiara Advani Wedding Date) 

हेही वाचा : "Private Life दाखवत पैसे कमवले अन् आला फ्री ड्रिंक्ससाठी...", Malaika Arora ट्रोलिंगची शिकार

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नासाठी कडेकोड बंदोबस्त असणार आहे. त्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी जैसलमेरला एक सिक्योरिटी टीम पाठवण्यात येणार आहे. सिद्धार्थ आणि कियारा हे जैसलमेर पॅलेस या आलिशान हॉटेलमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. दरम्यान, सिद्धार्थ- कियारा किंवा त्या दोघांच्या जवळच्या कोणत्या व्यक्तीनं अजून या बातमीला दुजोरा दिलेला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, नुकतीच कियारा आणि सिद्धार्थनं रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा साहनी, आई नीतू कपूर, करण जोहर, मनिष मल्होत्रा या सगळ्यांसोबत न्यू इयर पार्टीत सहभागी झाले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सिद्धार्थ आणि कियारा हे दोघे 29 डिसेंबर रोजी एअरपोर्टवर दिसले. येणार नवं वर्षे सिद्धार्थ आणि कियारा एकत्र साजरा करणार आहेत असा अंदाज त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी लावला आहे. तर सिद्धार्थ आणि कियारा नवीन वर्षाचे स्वागत दुबईत करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनी 2021 साली प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह (Shershaah) या चित्रपटात एकत्र काम केलं होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ हे सगळीकडे एकत्र दिसले. या दोघांच्या वर्कफ्रंट  बद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ लवकरच, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' (Indian Police Force) या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, कियाराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.