सिद्धार्थ चांदेकर आजही जपतोय 'तो' खजिना; स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं केला शेअर

Siddharth Chandekar News: सिद्धार्थ चांदेकर आपल्या सगळ्यांचाच लाडका अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट हे गाजले आहेत. त्याचसोबत मालिकांमधूनही तो आपल्या समोर आला आहे यावेळी त्याची एक खास पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 15, 2023, 12:43 PM IST
सिद्धार्थ चांदेकर आजही जपतोय 'तो' खजिना; स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं केला शेअर title=
August 12, 2023 | siddarth chandekar post and old memory on the occasion of independence day

Siddharth Chandekar News: आज देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन आहे. त्यामुळे सर्वत्र नागरिकांमध्ये आजच्या दिवशी आनंद आणि उत्साह आहे. सध्या यावेळी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिद्धार्थ चांदेकर हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. तो आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतला हार्टथ्रॉब अभिनेता आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2009 साली आलेल्या 'अग्निहोत्र' या मालिकेतून त्यानं मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले होते. त्यामुळे त्याची तरूणाईत चांगलीच क्रेझ निर्माण झाली होती. जी आजही आहे. आज स्वातंत्र्यादिनाच्या निमित्तानं सिद्धार्थनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सर्वत्र चर्चा आहे. आपल्याला ती पोस्ट पाहून आपल्या बालपणाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर त्यानं ही पोस्ट आज शेअर केली आहे तेव्हा जाणून घेऊया की नक्की ही पोस्ट काय? 

आजकालच्या युगात तरूणाईची अनेक गोष्टींमध्ये ओढातोण होताना दिसते. आपल्या सर्वच कामात ती व्यग्र आणि व्यक्त आहे त्यामुळे अशावेळी शांतपणे बसून श्वास घेण्याचीही त्यांना फूरसद नाही. अशाच अनेकांना परत शाळेची, कॉलेजची आठवणही आल्याशिवाय राहत नाही. आताच्या जबाबदाऱ्या आणि आव्हानं पाहता परत लहान व्हावं अशी अनेकांची इच्छा असते. त्यातून सध्याच्या स्पर्धाच्या युगात तर जास्तच. आपल्याला शाळेच्या पाठ्यपुस्तकांचीही तितकीच आठवण येते. आजच्या डिजिटलच्या युगात या पाठ्यपुस्कांची किंमत काय होती याची किंमत शाळा अनुभवलेल्या प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे आपल्या त्या आठवणी कधीच परच येणार नाहीत. त्यातून सध्या सिद्धार्थ चांदेकर याची पोस्ट आपल्याला त्याच जगात घेऊन जाईल. 

हेही वाचा -  अक्षय कुमार, आमिर खान, सनी देओल यांचे देशभक्तीवरील 'हे' सर्वाधिक गाजलेले चित्रपट 

''स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा! जय हिंद'', असं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांनी यावेळी त्याचे कौतुक केले आहे. अनेकांनी त्याच्या या पोस्टवरून कौतुकाच्या कमेंट्स केल्या आहेत. तर एकानं लिहिलंय की, हे पाहून पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं वाटलं. आपल्याला माहितीच आहे की इंग्रजी माध्यमातील विद्यार्थांना Pleage ही इंग्रजीतून प्रतिज्ञा असते. आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठीत. सिद्धार्थनं मराठीतून प्रतिज्ञा शेअर केली आहे. त्यावर एकानं कमेंट केली आहे की, ''तु मराठी माध्यमात होतास?''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या पोस्ट अनेकदा व्हायरल होत असतात. त्यांची स्पेन ट्रीपही बरीच गाजली होती. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. 2021 मध्ये त्यांनी लग्न केले.