मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या खूप चर्चेत आहे. आपल्या सौंदर्याने आणि तिच्या स्टाइलने आधीच लोकांना वेड लावणारी पलक आता तिच्या अभिनयाने आणि तिच्या डान्स मूव्ह्सने दहशत निर्माण करत आहे. पलक तिवारीची बोल्ड फॅशन सेन्स कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती असा ड्रेस घालून लोकांसमोर आली. ज्यामुळे ती ट्रोलिंगची शिकार झाली.
वास्तविक पलक तिच्या हॉट लूकसाठी ओळखली जाते. मात्र गेल्या दिलसांत पलक तिची आई श्वेता तिवारीसोबत एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती आणि यावेळी तिला तिच्या ड्रेसमुळे ट्रोल व्हावं लागलं. पलक तिवारीचं नवीन गाणं 'बिजली बिजली' खूप हिट होत आहे. या गाण्याच्या सेलिब्रेशनसाठी पलक तिच्या आईसोबत कार्यक्रमात आली होती. यावेळी पलकने ब्लॅकनेटचा ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत होती.
काहींना तिची ही शैली आवडली आहे. तर काहींनी तिला टार्गेट करून खूप सुनवलं आहे. पलकचा ड्रेस पाहिल्यानंतर लोकांनी असा ड्रेस घालण्यापूर्वी आईच्या इज्जतीची काळजी घ्यावी, असा सल्ला तिला दिला आहे. या कार्यक्रमात पलक आणि श्वेता तिवारीनेही जबरदस्त डान्स केला आहे. दोघांचा हा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे. आईसोबत तिची ही स्टाईल लोकांना आवडली नाही.
एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, 'आई आपल्या मुलीला सार्वजनिक ठिकाणी अशा कपड्यांमध्ये कसं पाहू शकते'. श्वेताचे चाहते म्हणत आहेत की, पलकने काळजी घ्यावी की, ती तिच्या आईसोबत कसे कपडे घालते? पलक आणि श्वेता तिवारीच्या डान्स व्हिडिओवरही लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.