Shweta Tiwari Bold Scene | रुपेरी पडद्यावर इंटिमेट सीन देणे ही सोपी गोष्टी नाही. हा सीन देण्यासाठी अभिनेत्रींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आजकाल असे सीन्स केवळ चित्रपटांपूरता मर्यादित न राहता मालिका किंवा वेब सीरिजमध्ये देखील पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्वेता तिवारी हिने देखील तिच्या वेब सीरिजमध्ये असाच एक सीन दिला होता. हा तिच्या संपूर्ण करिअरमधील पहिला इंटिमेट आणि किसिंग सीन आहे.
श्वेता तिवारीसाठी इंटिमेट सीनचे चित्रीकरण करणे फार कठीण होते. असे ती सांगते. छोट्या पडद्यावरील ‘कसौटी जिंदगी की’ या एकता कपूरच्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली श्वेता एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेब सीरिजचे नाव ‘हम तुम अॅड देम’ होते. श्वेतासह अभिनेता अक्षय ओबेरॉय मुख्य भूमिकेत होता. या सीरिजमध्ये श्वेता आणि अक्षयने इंटिमेट आणि किसिंग सीन दिले आहेत.
श्वेताने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे इंटिमेट सीन देणे कठीण असल्याचे सांगितले होते. मी थोडी घाबरले होते. मी सीरिज निर्मात्यांना फोन केला आणि विचारले हे काय आहे? मला ट्रेलर आवडला नाही. मला कळत नव्हते आईला, कुटुंबीयांना आणि मित्र परिवाराला हा ट्रेलर कसा दाखवू. नंतर मी माझ्या मुलीला ट्रेलर दाखवला आणि तिचे मत विचारले’ असे श्वेता म्हणाली.
श्वेताची मुलगी पलकची प्रतिक्रिया पाहून श्वेता देखील आश्चर्यचकित झाली. ‘माझी मुलगी म्हणाली आई ट्रेलर खूप मस्त आहे. त्यानंतर मी ट्रेलर शेअर केला आणि निर्मात्यांची फोन करुन माफी मागितली’ असे श्वेता पुढे म्हणाली.