अस्थिविर्सजनानंतर आता या दिवशी होणार श्रीदेवींची प्रेयर मीट...

श्रीदेवींनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये साधारणपणे ३०० सिनेमांत काम केले आहे. 

Updated: Mar 10, 2018, 12:06 PM IST
अस्थिविर्सजनानंतर आता या दिवशी होणार श्रीदेवींची प्रेयर मीट... title=

 मुंबई : श्रीदेवींनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये साधारणपणे ३०० सिनेमांत काम केले आहे. आपल्या अभिनयाने आणि अदांनी त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. मॉम हा श्रीदेवींचा शेवटचा सिनेमा ठरला.

प्रेयर मीटचे आयोजन

दुबईत कौटुंबिक लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या श्रीदेवींचा तिथेच बाथटबमध्ये बुडून अचानक मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इमामात अंत्यसंस्कार झाल्यावर बोनी कपूर यांनी त्यांचे अस्थिविसर्जन केले. त्यानंतर आता श्रीदेवींच्या प्रेयर मीटचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ११ मार्चला संध्याकाळी ६-७:३० या वेळात चेन्नईत ही प्रेयर मीट होईल.

पुन्हा पुर्ववत होण्याचा प्रयत्न

श्रीदेवींच्या अचानक जाण्यामुळे मातृछत्र हरवलेल्या खुशी आणि जान्हवी यांनी आईच्या निधनाचे दुःख पचवत पुन्हा पुर्ववत होण्याचा प्रयत्न करत आहेत. जान्हवीने धडक सिनेमाच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे.