श्रीदेवीचे पार्थिव रात्री १०.३० वाजता मुंबई विमानतळावर

अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव आज रात्री १०-३० वाजता मुंबई विमानतळावर दुबई पोलिस घेऊन येणार असल्याची माहिती समोर आलीय. 

Updated: Feb 27, 2018, 04:52 PM IST
श्रीदेवीचे पार्थिव रात्री १०.३० वाजता मुंबई विमानतळावर  title=

अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव आज रात्री १०-३० वाजता मुंबई विमानतळावर दुबई पोलिस घेऊन येणार असल्याची माहिती समोर आलीय. 

दुबई आणि मुंबई पोलीसांमध्ये कागदोपत्री प्रक्रिया पुर्ण झाल्यावर दुबई पोलिस मुंबई विमानतळावरुनच दुबईला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

असा असेल घटनाक्रम 

अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव भाग्य बंगला येथे नेण्यात येणार आहे.

कपूर कुटुंबियांना पार्थिव दर्शनाकरता ठेवण्यात येईल.

श्रीदेवीचे पार्थिव पवन हंस विमानतळाजवळील स्माशान भुमित अंतिम दर्शनासाठी रात्री १ वाजता ठेवले जाणार आहे. 

सकाळ पर्यंत अंतिम दर्शन सुरु राहणार आहे. 

सकाळी ९ च्या दरम्यान शासकीय इतमामात अभिनेत्री श्रीदेवीच्या पार्थिवाला अग्नी देऊन अंतिम संस्काराची प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे.