Shreyas Talpade on His Death News : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे विषयी एक धक्कादायक माहिती समोर आली होती. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या बातमीत श्रेयसचं निधन झाल्याचे म्हटले जात होते. या खोट्या अफवांवर त्यानं प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तो जिवंत आहे त्याचे निधन झालेले नाही असे त्यानं सांगितलं. त्याच्या निधनाच्या बातम्या या खोट्या असल्याचं त्यानं सांगितलं.
श्रेयसनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं की मला सगळ्यांना हे आश्वासन द्यायचे आहे की 'मी जिवंत आहे, आनंदी आणि हेल्दी आहे. मला एका पोस्टविषयी कळलं ज्यात असा दावा करण्यात आला आहे की माझं निधन झालं आहे. मला हे माहित आहे की मस्करी एका ठिकाणी असते, पण जेव्हा त्याचा चुकीचा वापर करण्यात येतो तेव्हा खरंच नुकसान देखील होते. कोणी याला एक विनोद म्हणून सुरु केलं असेल, पण त्यामुळे काही अनावश्यक अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यात माझ्या कुटुंबातील सदस्य आहे, ज्यांना माझी काळजी आहे, त्यांच्या भावना दुखावल्या.'
पुढे श्रेयस म्हणाला,'माझी छोटी मुलगी आहे, जी रोज शाळेत जाते. ती आधीच माझ्या आरोग्याला घेऊन चिंतेत असते. ती सतत मला प्रश्न विचारते. मी ठिक आहे ना हे विचारते. या अफवेमुळे ती आणखी घाबरली आहे. ती शाळेत तिच्या शिक्षकांना आणि मित्र-मैत्रिणींना प्रश्न विचारू लागली. जे लोक माझ्या निधनाच्या बातमीला हवा देत आहे, मला त्यांना इथेच थांबवायचं आहे. अनेकांनी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या होत्या. कोणताही विनोद कोणाच्या भावनांना दुखावू शकतो. माझं कुटुंब आणि शुभचिंतक असलेल्या सगळ्यांना या विनोदानं त्रास झाला आहे.
पुढे श्रेयस म्हणाला, 'जेव्हा तुम्ही कोणाला टार्गेट करण्यासाठी अशी चुकीची अफवा पसरवतात. तेव्हा खरंतर त्याच्यावर काही परिणाम होत नाही. पण त्याच्या कुटुंबावर होतो आणि सगळ्यात जास्त घरात असलेल्या छोट्या मुलांवर त्याचा परिणाम होतो. लहाणमुलं या परिस्थितीला समजू शकत नाही. ते लगेच भावूक होतात.'
हेही वाचा : बॉलिवूडच्या पार्ट्या कशा असतात? कंगनाने उघड केलं पडद्यामागील काळं सत्य, म्हणाली 'इंडस्ट्रीमधील मित्र...'
पुढे श्रेयस म्हणाला, 'या दरम्यान ज्यांनी कोणी माझ्या आरोग्या संबंधीत विचारणा केली त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम हे खूप महत्त्वाचं आहे. ट्रोर्ल्सना माझी एक विनंती आहे की कृपया हे सगळं बंद करा. असा विनोद कोणासोबत करुन नका. असं कधी कोणासोबत व्हायला हवं असं मला वाटत नाही. त्यामुळे सेन्सिटिव्ह व्हा. दुसऱ्यांच्या भावना दुखावल्या जातील असं काही करून लाइक्स आणि व्ह्यूज मिळवणं चुकीचं आहे.' दरम्यान, गेल्या वर्षी श्रेयसला हार्ट अटॅक आला होता. या बातमीनं देखील सगळ्यांना मोठा धक्का बसला होता.