मुंबई : बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये देखील आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा.
सध्या आपल्या हटके ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत आहे. प्रियंका कायमच आपला हटके लूक सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या अशाच एका ड्रेसमुळे प्रियंका ट्रोल झाली आहे. प्रियंका हॉलिवूड सिनेमाच्या प्री - स्क्रिनिंगसाठी हजेरी लावली होती. त्यावेळी तिने जो ड्रेस घातला होता त्यामुळे ती ट्रोल झाली.
प्रियंकाने काळ्या रंगाच्या स्वेटरवर मॅचिंग बूट घातले होते. आणि त्यावर ब्राऊन लिपस्टिक आणि डार्क मेकअप सुद्धा केला होता. आणि प्रियंकाच्या याच हटके लूकची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे.
प्रियंका कायम आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. मे २०१७ मध्ये मेट गालामध्ये प्रियंका राल्फ रॉलेनच्या ड्रेसमध्ये बघावयास मिळाली होती. तिचा हा ड्रेस खूपच महाकाय असल्याने सोशल मीडियावर यावरून तिची चांगलीच खिल्ली उडविण्यात आली होती.