मराठी सिनेसृष्टीवर कोरोनाचं संकट; प्रसिद्ध दिग्दर्शकानं गमावली जवळची खास व्यक्ती

मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का 

Updated: Apr 9, 2021, 03:43 PM IST
मराठी सिनेसृष्टीवर कोरोनाचं संकट; प्रसिद्ध दिग्दर्शकानं गमावली जवळची खास व्यक्ती title=

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. असं असताना मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. 'फत्तेशिकस्त' या सिनेमाचे संकलन करणारे प्रमोद कहार यांचे निधन झाले आहे. कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. ( Editor Pramod Kahar dies of covid-19) कोरोनावर उपचार सुकरू असताना त्यांची प्रकृती खालावली. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. 

प्रमोद कहार हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध एडिटर म्हणून ओळखले जात होते. त्यांनी 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोनिश पवार दिग्दर्शित 'धोंडी' या चित्रपटासह 'फर्जंद' या चित्रपटासाठी एडिटर म्हणून भूमिका बजावली होती. आगामी 'पावनखिंड' या चित्रपटासाठीदेखील ते काम करत होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pramod Kahar (@pramodkahar)

फत्तेशिकस्त सिनेमा पुण्यात मुघलांसोबत झालेल्या लढाईवर चित्रित केलेला आहे. शाहिस्तेखान पुण्यात तळ ठोकून बसला असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साहाय्याने पुण्यातील लाल महालावर हल्ला करून महाकाय शाहिस्तेखानाची बोटे छाटली. हा हल्ला म्हणजे फक्त एक शौर्य गाथा नसून बलाढ्य मुघल सैन्याला मारलेली चपराक होती. भारतातील सर्वात पहिला ‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणून या घटनेकडे बघितले जाते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pramod Kahar (@pramodkahar)

मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अनुप सोनी, अंकित मोहन, मृण्मयी देशपांडे या सारख्या दर्जेदार कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. देवदत्त मनीषा बाजी यांनी संगीतबद्ध केलेले संगीत आणि संत तुकारामांच्या अभंगांवर आधारित गाणी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात.

कोरोनाचं सावट असताना मराठी सिनेसृष्टीने लोकप्रिय एडिटर गमावला आहे. आशालता वाबगांवकर यांनी 22 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनामुळे आपला जीव गमावला. आई माझी काळूबाई या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह सेटवरील इतर 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.