मुंबई : मुंबईत आपल्या बॉयफ्रेंडसोबत नवीन वर्षाच्या पार्टीत सहभागी झालेल्या तरूणीचा मृतदेह पोलिसांना अर्धनग्न अवस्थेत सापडला. या घटनेची सध्या चर्चा रंगली आहे. निर्दयीपणे केलेल्या या हत्येची एक एक माहिती आता समोर येत आहे. थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ज्यांच्यासोबत पार्टी केली त्यांनीच जान्हवीला जीवे मारलं. लव्ह ट्रँगलमधून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पार्टीत (New Year Party) पीडित जान्हवी कुकरेजा (Janhavi Kukreja Murder Case) ला मुंबईततील खार परिसरात १५ व्या मजल्यावरून बॉयफ्रेंडने आपल्या दुसऱ्या गर्लफ्रेंडच्या मदतीने फेकून दिलं. सुरूवातीला हे लव ट्रँगल असल्याचं समजलं.
या पार्टीत जान्हवीनं तिच्या बॉयफ्रेंडला एका तरुणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. यावरुन तिघांमध्ये वादावादी झाली. त्यातून दोघांनी जान्हवीला मारहाण केली. या मारहाणीत जान्हवीचा जागीच मृत्यू झाला. जान्हवीचा मृत्यू रात्री दीड वाजता झाला होता पण तिच्या आईवडिलांना याची साधी माहितीही देण्यात आली नव्हती.
थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ज्यांच्यासोबत पार्टी केली त्यांनीच जान्हवीला जीवे मारलं. लव्ह ट्रँगलमधून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.