अभिनेता शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; त्याच्या आयुष्यात 'ती'ची एन्ट्री

शिव कायमच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आज शिवच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा क्षण आहे. साधाभोळा मराठोळा अभिनेता शिवच्या आयुष्यातील महत्वाच्या क्षणानंतर त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Updated: Mar 16, 2023, 06:27 PM IST
अभिनेता शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; त्याच्या आयुष्यात 'ती'ची एन्ट्री title=

मुंबई : अभिनेता शिव ठाकरे आज कोणाला माहिती नाही असं क्वचितच कोणी असेल. हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर शिव ठाकरेच्या आयुष्यात तिने एन्ट्री घेतलीय. खरंतर शिव कायमच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आज शिवच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा क्षण आहे. साधाभोळा मराठोळा अभिनेता शिवच्या आयुष्यातील महत्वाच्या क्षणानंतर त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

आता आम्ही तुम्हाला सांगतो की, शिवच्या आयुष्यात येणारी ती कोणी व्यक्ती नसून त्याची पहिली नवी कार आहे.  डाऊन टू अर्थ शिव ठाकरेने अखेर स्वत:साठी नवीन कार खरेदी केली आहे. आता शोरूमधील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शिवचा नव्या कारसोबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवचे चाहते सोशल मीडियावर त्याचं खूप अभिनंदन करत आहेत. यावेळी शिव ठाकरेने आपल्या नवीन गाडीची नारळ फोडून पारंपरिक पद्धतीने पुजा केली. तसंच त्याने केक कापून सेलिब्रेशनही केल्याचं आपण व्हिडिओत पाहू शकतो. दोन सेकंड हँड कारनंतर शिव ठाकरेची पहिली नवीन कार पाहून त्यांचे चाहतेही खूप खूश आहेत. व्हिडिओमध्ये शिव ठाकरे त्याच्या गाडीला किस करताना दिसत आहेत.

पापाराझींकडून शिव ठाकरेचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत शिव ठाकरे नारळ फोडताना दिसत आहेत.  शिवाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे चाहते त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. लोकं शिवच्या व्हिडिओवर कमेंट करत म्हणतायेत की, शिवाच्या कष्टाचं फळ त्याला मिळत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिव ठाकरेने. एमटीव्ही रोडीज रायझिंगमध्ये भाग घेऊन पदार्पण केलं. जिथे तो सहाव्या क्रमांकावर होता.  2019 मध्ये, त्याने बिग बॉस मराठी 2 मध्ये भाग घेतला आणि तो विजेताही ठरला. यानंतर तो हिंदी बिग बॉसमध्ये झळकला आणि  उपविजेता ठरला. 

शिव ठाकरेचा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात झाला. एका मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचं पूर्ण नाव शिव मनोहरराव उत्तमराव झिंगुजी गणुजी ठाकरे. तो क्षत्रिय जातीचा आहे. त्याच्या वडिलांचं नाव मनोहर ठाकरे आहे. त्याच्या वडिलांची पान टपरी आहे. डाऊन टू अर्थ आपला मराठमोळा शिव ठाकरे आज लाखो दिलो की धडकन आहे.