मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसबाबत खूपच गंभीर आहे. फिटनेसवर ती विशेष लक्ष देते. शारिरीक आणि मानसिक आरोग्य फीट असणं खूप गरजेचं आहे असं तिचं मत आहे. शिल्पा नेहमी योगचे फायदे सांगत असते. योगा करतांना ती अनेक व्हिडिओ देखील शेअर करत असते. नुकताच शिल्पाने आणखी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी अधोमुखस्वनासन करतांना दिसत आहे. या योगाचा तुमच्या पाठीचा कण्याला फायदा होतो. गुडघ्यांच्या नसांसाठी देखील या योगा महत्त्वाचा आहे. शिल्पाने व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, Burning out the BIRYANI... हा योगा मांडी आणि गुडघ्यांच्या नसांमध्ये येणारा ताण कमी करतो.'