मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे अनेक अभिनेत्री चर्चेत आल्या. अशाच अभिनेत्री पैकी एक म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी. शिल्पाने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि रिऍलिटी शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवलं, पण यशाच्या उच्च शिखरावर चढत असताना शिल्पाच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त वळणं आली. त्यामधील एक म्हणजे हादरवून सोडणारे शिल्पाच्या Kiss चे वादग्रस्त किस्से. हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे आणि मंदिराच्या एका साधूने शिल्पा शेट्टीच्या गालाला केलेलं किस....
शिल्पाच्या आयुष्यातील वादग्रस्त किस्से
साधूने शिल्पा शेट्टीच्या गालाला केलेलं किस
'महायात्रा'च्या शुटिंगसाठी 2009 मध्ये ओरिसाच्या सखीगोपाल मंदिराच्या एका साधूने शिल्पा शेट्टीच्या गालाला किस केलं होतं. या किसनंतरही बरीच चर्चा झाली. पण हे साधू माझ्या वडिलांच्या वयाचे असल्याचं म्हणत एक वडिल त्यांच्या मुलीच्या गालाला किस करु शकत नाहीत का? असा प्रश्न तिनं केला होता.
रिचर्डने केलेलं किस
एका कार्यक्रमामध्ये हॉलिवूड स्टार रिचर्ड गेरेही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी शिल्पाला भर कार्यक्रमात किस केलं होतं. ज्यानंतर शिल्पाविरोधात तक्रार दाखल केली. जवळपास 15 वर्षांनंतर शिल्पाला अश्लीलता आणि अभ्रदपणाच्या गंभीर आरोपांतून न्यायालयानं दिलासा दिला.
राज कुंद्रा पॉर्नोग्राफी केस
जेव्हा शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात पकडला गेला तेव्हा तुरुंगात जाताच शिल्पा शेट्टीचा ट्रेंड सुरू झाला. यानंतर सोशल मीडियावर अफवाही पसरू लागल्या की शिल्पा त्याला घटस्फोट देणार आहे. अखेर या गोष्टी अफवा ठरल्या. शिल्पा आणि राज अजूनही त्यांचे आयुष्य आनंदाने जगत आहेत.