शिल्पा शेट्टीने भर कार्यक्रमात दिग्दर्शकावर फोडली काचेची बाटली, कारण...

शिल्पा शेट्टी दिग्दर्शकाची ती गोष्ट खटकली, ज्यामुळे अभिनेत्रीने त्याच्यावर फोडली काचेची बाटली... व्हिडीओ व्हायरल  

Updated: Mar 3, 2022, 09:00 AM IST
शिल्पा शेट्टीने भर कार्यक्रमात दिग्दर्शकावर फोडली काचेची बाटली, कारण... title=

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.  व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे शिल्पा कायम चर्चेत असते. आता देखील शिल्पाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या शिल्पा 'इंडियाज गॉट टॅलेंट' शोमध्ये परीक्षकाची धुरा सांभाळत आहे. तिच्यासोबत गायक बादशाह देखील परीक्षकाची भूमिका सांभाळत आहे. यावेळी शोमध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टी पाहुणा म्हणून आला. 

पण शिल्पाने त्याच्या हातावर बाटली फोडून मारली. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे शिल्पा चर्चेत आली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओमध्ये रोहित बादशाहसोबत बोलताना दिसत आहे आणि शिल्पा रोहितला सतत आवाज देताना दिसत आहे. पण रोहित तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि बादशाहसोबत बोलत राहतो.. तेव्हा शिल्पा रोहित आणि बादशाहाच्या हातावर बाटली फोडते. 

'इंडियाज गॉट टॅलेंट'मधील हा मजेदार व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. खुद्द शिल्पाने तिच्या इनस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.