Sidharth Shukla याने Shehnaaz Gill च्या कुशीत घेतला होता अखेरचा श्वास, त्यानंतर...

Shehnaaz Gill चा आज वाढदिवस आहे. शहनाज आणि दिवंगत अभिनेता हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. तर सिद्धार्थनं शहनाजच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला होता. 

Updated: Jan 27, 2023, 05:30 PM IST
Sidharth Shukla याने Shehnaaz Gill च्या कुशीत घेतला होता अखेरचा श्वास, त्यानंतर... title=

Shehnaaz Gill and Sidharth Shukla Relation : 'बिग बॉस 13' (Bigg Boss) गाजवल्यानंतर अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. शहनाज आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांच्यात असलेली केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. शहनाज आणि सिद्धार्थ यांचं नातं इतकं घट्ट होते की सिद्धार्थच्या शेवटच्या क्षणी देखील ती सिद्धार्थसोबत होती. सिद्धार्थनं त्याचा शेवटचा श्वास हा शहनाजच्या कुशीत घेतला होता, असे म्हटले जाते. 

सिद्धार्थनं 2 सप्टेंबर 2021 रोजी अखेरचा श्वास घेतला. तेव्हा तो शहनाजसोबतच होता असे म्हटले जाते. लाइव्ह हिंदुस्तानच्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थला पहाटे पहाटे तीन वाजता अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर सिद्धार्थनं शहनाजला सांगितले की त्याला छातीत दुखत आहे. सिद्धार्थनं त्याला त्रास होत असल्याचे सांगताच शहनाजनं त्याच्या आईला फोन केला होता. सिद्धार्थची आई त्याच बिल्डिंगमध्ये दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहत होती. त्यानंतर सिद्धार्थची आई त्याच्या फ्लॅटवर आली आणि सिद्धार्थला अवस्थ वाटत असल्यानं त्यांनी त्याला पाणी दिले आणि परत स्वत: च्या फ्लॅटवर निघून गेली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे दिलेल्या माहितीनुसार, आई गेल्यानंतर सिद्धार्थ हा शहनाजच्या हातात डोकं ठेवून झोपला होता. थोडा वेळानंतर म्हणजेच 5 वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थचे शरीर थंड पडल्याचे शहनाजला जाणवले. शहनाजनं लगेचच सिद्धार्थला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र, तो उठत नव्हता. शहनाजनं लगेचच सिद्धार्थची आई आणि बहिणीला कॉल केला. ते आले आणि त्यांनी सिद्धार्थला रुग्णालयात नेले त्यानंतर सिद्धार्थला मृत घोषित करण्यात आले. 

शहनाजनं केला होता आत्महत्या करण्याचा प्रयत्न

दरम्यान, हिमांशी खुरानाने बिग बॉसशोमध्ये सांगितले की, तिच्या मेकअपमनला शहनाज गिल रस्त्यावर रडताना दिसला. शहनाज ढसाढसा रडत होती. तेव्हा मेकअपमनने हिमांशीला फोन करून ही गोष्ट सांगितली. हिमांशी आणि शहनाजमध्ये इतका वाद झाला होता की त्यांच्यात झालेल्या वादातून शहनाजनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं तिच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 

हेही वाचा : 3 मिनिटांच्या Item Song साठी Urvashi Rautela नं घेतले इतके कोटी, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

शहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्यामुळे चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी सज्ज झाले आहेत. कायम आपल्या खोडकर स्वभावामुळे चर्चेत असणारी शहनाज आता परफेक्ट फिगरमुळे देखील चर्चेत असते. शहनाज हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय नाव आहे. शहनाज यारी (गुरु), येस बेबी (गॅरी संधू), लाख लहता (रवनीत सिंग) सारख्या अनेक पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. यासोबतच तिने अनेक हिंदी म्युझिक अल्बममध्येही काम केले आहे. शहनाज गिल ही कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. तिची एकूण संपत्ती 30 दशलक्ष म्हणजे 3 कोटी असल्याचं बोललं जात आहे. शेहनाज कोणत्याही कार्यक्रमांच्या प्रमोशनसाठी मोठी रक्कम आकारते. शहनाजने अलीकडेच मर्सिडीज बेंझ एस गाडीही खरेदी केली आहे.