माझ्या मुलीचे आयुष्य...; सोनाक्षी-जहीरच्या लग्नाबाबत पहिल्यांदा उघडपणे बोलले शत्रुघ्न सिन्हा

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाच्या चर्चांना सध्या जोर धरला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 20, 2024, 10:16 AM IST
माझ्या मुलीचे आयुष्य...; सोनाक्षी-जहीरच्या लग्नाबाबत पहिल्यांदा उघडपणे बोलले शत्रुघ्न सिन्हा   title=
Shatrughan Sinha will attend Sonakshi Sinha-Zaheer Iqbal wedding give reply to trollers

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. जून 23 रोजी सोनाक्षी अभिनेता जहीर इकबाल याच्यासोबत लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिकादेखील व्हायरल झाली आहे. मात्र, अद्याप सोनाक्षीकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र, सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नामुळं शत्रुघ्न सिन्हा आणि कुटुंबीय नाराज असल्याची चर्चा आहे. सोनाक्षीची आई आणि भाऊ दोघांनीही तिला अनफॉलो केले असल्याच्या चर्चां असतानाच आता यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सोनाक्षीच्या लग्नाला तीन दिवस उरले असताना या सर्व प्रकरणांवर शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. झूमला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी फेक न्यूज पसरवणाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, शेवटी हे आयुष्य कोणाचं आहे? हे माझ्या मुलीचे आयुष्य आहे आणि यावर मला खूप अभिमानदेखील आहे. सोनाक्षी मला तिची ताकद समजते. मी तिच्या लग्नाला हजर राहणारच. तिला तिच्या पसंतीचा जोडीदार शोधण्याचा पूर्णपणे हक्क आहे. मी माझ्या मुलीच्या निर्णयासोबत आहे, असं म्हणत त्यांनी सोनाक्षीला पाठिंबा दिला आहे. 

सिन्हा यांनी पुढे म्हटलं आहे, सोनाक्षी आणि जहीर यांना त्यांचे आयुष्य एकत्रित व्यतित करायचे आहे. त्यांची जोडी छान दिसते. जे लोक या आनंदाच्या क्षणी फेक न्यूज पसरवतात ते फ्रस्टेट दिसत आहेत. ते खोट्या बातम्या पसरवत आहेत. मी त्यांना माझ्या सिग्नेचर डायलॉगमध्ये इशारा देऊ इच्छितो की, खामोश, तुमच्या कामाशी काम ठेवा, असं म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहेत 

शत्रुघ्न सिन्हा आता सोनाक्षीच्या लग्नावर नाराज नसल्याचे समोर आले आहे. तसंच, ते सोनाक्षीच्या लग्नातदेखील सहभागी होणार असल्याचे समोर आले आहे. सोनाक्षीच्या लग्नाचे विधी 20 जून रोजीपासून सुरू होणार आहेत. तर, 23 जून रोजी दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. सोनाक्षी आणि जहीर दोघेही 7 वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोनाक्षीने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. त्यात ती तिच्या मैत्रिणींसोबत दिसत आहे. सोनाक्षीच्या बॅचलर पार्टीचे हे फोटो असल्याचे बोलले जात आहे. तर, एकीकडे जहीरही त्याच्या मित्रासोबत दुबई येथे बॅचलर पार्टी सेलिब्रेट केली होती. झहीर आणि सोनाक्षी यांच्या या फोटोवरुन लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असल्याचे कन्फर्म झाले आहे.

दरम्यान, सोनाक्षी सिन्हा आणि जहीर हे 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी 2022 मध्ये डबल XL चित्रपटात एकत्र काम केले होते.