नाराजीच्या चर्चा सुरु असतानाच सोनाक्षीच्या होणाऱ्या सासरी पोहोचले शत्रुघ्न सिन्हा आणि...!

Shatrughan Sinha Meets Daughter Sonakshi Sinha's In Laws : शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली लेक सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या नवऱ्याची आणि सासऱ्यांची भेट...

दिक्षा पाटील | Updated: Jun 21, 2024, 11:15 AM IST
नाराजीच्या चर्चा सुरु असतानाच सोनाक्षीच्या होणाऱ्या सासरी पोहोचले शत्रुघ्न सिन्हा आणि...!  title=
(Photo Credit : Social Media)

Shatrughan Sinha Meets Daughter Sonakshi Sinha's In Laws : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तिच्या बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत 23 जून रोजी लग्न बंधनात अडकणार आहे. तर असे म्हटले जात होते की झहीर इक्बालसोबत अचानक लग्न ठरवल्यानं सोनाक्षीचे वडील म्हणजेच शत्रुघ्न सिन्हा हे नाराज होते.  इतकंच नाही तर लेक सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नात हजेरी लावणार नाही असे म्हटले जात होते. पण या सगळ्या अफवांवर पूर्णविराम लावला आहे. खरंतर, शत्रुघ्न सिन्हा यांनी काल गुरुवारी त्यांचा होणारा जावई झहीर इक्बालची आणि त्याच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्याचे फोटो देखील काढले. 

शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा शुक्रवारी मध्यरात्री इक्बालच्या घरातून निघताना दिसले. या दरम्यान, झहीर हा होणारे सासरे शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत दिसला. तर मुंबईत इहीरच्या घरी गेलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी त्याच्यासोबत आनंदानं फोटो काढले. त्यांनी झहीरला मिठी देखील मारली आणि मस्करी करत पापाराझींना खामोश असं चांगल्या मूडमध्ये म्हणाले. जे पाहून असं म्हणता येईल की ते खूप आनंदी होते. त्यांनी त्यांच्या गाडीच्या दिशेनं जायच्या आधी फोटोग्राफर्सना हॅलो देखील म्हटले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत सोनाक्षीच्या लग्नांवर असलेल्या अफवांवर त्यांचं मत मांडलं आणि जे लोक त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात आहेत, त्यांच्यावर निशाणा साधला. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, 'मला सांगा, शेवटी हे कोणचं आयुष्य आहे? हे माझ्या एकुलत्या एक मुलीचं सोनाक्षीचं आयुष्य आहे. जिच्यावर मला खूप गर्व आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. ती मला तिचा पिलर ऑफ स्ट्रेंथ बोलते. मी नक्कीच लग्नात उपस्थित असेन. मी असं का करायला नको आणि मला का जायला हवं?'

शत्रुघ्नननं सांगितलं की 'सोनाक्षीला तिचा साथिदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते तिच्या निर्णयाला पाठिंबा देत आहेत.' शत्रुघ्नन यांनी त्यांच्या लेकीच्या होणाऱ्या नवऱ्यावर देखील कमेंट केली. ते म्हणाले 'सोनाक्षी आणि झहीरला एकत्र आयुष्य काढावं लागेल. ते एकत्र खूप चांगले दिसतात.'

हेही वाचा : आवडत्या गायकाबरोबर अशी पोज देऊन फोटो काढला की ठरलेलं लग्न मोडलं; जगभरात चर्चा

ते पुढे म्हणाले की 'त्या आनंदाच्या क्षणाच्या वेळी, जे लोक अफवा पसरवत आहेत त्यांच्यावर ते नाराज आहेत. त्याचं कारण म्हणजे ते अफवांशिवाय काही पसरवत नाही आहेत. मला त्यांना माझ्या सिग्नेचर डायलॉगनं सावधान करु इच्छितो की खामोश, याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही.'