सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर 51 दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नानंतर 51 दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा? वाचा सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 13, 2024, 08:27 PM IST
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर 51 दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले... title=

Sonakshi Sinha Marriage: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने 23 जून रोजी झहीर इक्बालसोबत लग्न केले. या लग्नाला आता 51 दिवस झाले आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे लग्नानंतर हनिमूनसाठी गेले होते. त्यांनी त्यांचे रोमँटिक फोटो देखील चाहत्यांसोबत शेअर केले. मात्र, या लग्नाबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवाही पसरल्या आहेत. कुणी म्हटलं की, अभिनेत्रीचे दोन्ही भाऊ सोनाक्षीच्या लग्नावर खूश नाहीत. तर कुणी म्हटलं की, अभिनेत्रीचे वडील शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीवर नाराज आहेत. या सर्व अफवांवर आज शत्रुघ्न सिन्हा यांनी आपलं मत स्पष्ट केलं आहे. 

शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलगी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांना 'मेड फॉर ईच अदर' असं म्हणाले. आमच्या आशीर्वादाने दोघांनी लग्न केले. त्यांनी कोणतेही बेकायदेशीर काम केलं नाही असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. 

काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा? 

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नावर शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा लग्नाचा विषय आहे. दुसरे म्हणजे, जर मुलांनी लग्न केले तर ते बेकायदेशीर नाही. आमच्या संमतीने आणि आमच्या आशीर्वादाने त्यांनी लग्न केले आहे. आम्ही त्यांचे कौतुक करतो. मी माझ्या मुलीच्या पाठीशी उभा राहणार नाही तर कोण उभं राहणार. माझी पत्नी पूनम सिन्हा आणि मी तिच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र उभे होतो. तो खूप आनंदाचा क्षण होता. 

पुढे ते म्हणाले की, पालक नेहमी त्यांच्या मुलांच्या आनंदासाठी उभे असतात आणि मला वाटते की आमची मुले आनंदी आहेत.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

7 वर्षे डेट केल्यानंतर लग्न

7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने 23 जून रोजी मुंबईतील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये कोर्ट वेडिंग केले होते. यानंतर त्यांनी शिल्पा शेट्टीच्या आलिशान रेस्टॉरंट बास्टियनमध्ये ग्रँड वेडिंग रिसेप्शन आयोजित केले होते. ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.