शाहरुख खानचा लेक 'या' Big Buget सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये एंट्री?

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार आहे? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.

Updated: Oct 3, 2022, 01:14 PM IST
शाहरुख खानचा लेक 'या'  Big Buget सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये एंट्री? title=

मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार आहे? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. आर्यनचे चाहते त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आर्यन चित्रपटात कधी काम करणार हे माहीत नाही, पण त्याच्या फॅन पेजने सिनेप्रेमींना खास ट्रीट दिली आहे.

ब्रह्मास्त्र 2 च्या पोस्टरवर आर्यनचा बोलबाला 
आर्यन खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहरुख खानचा लाडका मुलगा 'ब्रह्मास्त्र 2' च्या पोस्टरवर 'वानरास्त्र' म्हणून दिसत आहे. 'ब्रह्मास्त्र 2'च्या पोस्टरमध्ये आर्यन खानला 'वानरास्त्र'च्या अवतारात पाहून चाहते खूश झाले आहेत. मात्र ब्रह्मास्त्र 2 चे हे मूळ पोस्टर नसून आर्यन खानच्या चाहत्यांनी हे पोस्टर बनवलं आहे.
 
'ब्रह्मास्त्र 2'च्या पोस्टरवरील आर्यन खानचा फोटो सोशल मीडियावर सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. आर्यन खानचे हे पोस्टर त्याच्या चाहत्यांनी बनवले असेल, पण ते पाहण्यासाठी लोक कमालीचे उत्साहित झाले आहेत. शाहरुख खाननंतर आता त्याच्या लाडक्या आर्यनला 'वानरास्त्र'च्या अवतारात पाहण्याची मागणी चाहते करत आहेत. व्हायरल फोटोवर एका चाहत्याने कमेंट केली आहे की, आर्यन खानला यंग 'वानरास्त्र' म्हणून पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. दुसर्‍या यूजरने लिहिलं, व्वा...ब्रह्मास्त्र 2.
 
शाहरुखने ब्रह्मास्त्रमध्ये खोलवर छाप सोडली
चाहत्यांनी सांगितलं की, जर त्यांना शाहरुख खाननंतर 'वानरास्त्र'च्या भूमिकेत कोणाला पाहायचं असेल तर तो शाहरुख खानचा नवाब आर्यन खान आहे. तुम्हाला माहित असेलच की, शाहरुख खानचा ब्रह्मास्त्रमध्ये 20 मिनिटांचा कॅमिओ होता. वानरस्त्राच्या भूमिकेत ते झाकले गेले. ब्रह्मास्त्रमधला शाहरुख खानचा कॅमिओ चित्रपट रसिकांसाठी केक ऑन चेरी होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

छोट्याशा भूमिकेत शाहरुखने आपल्या दमदार अभिनयाने अशी छाप सोडली की चाहते घायाळ झाले. शाहरुखच्या व्यक्तिरेखेवर आधारित चित्रपटाची मागणी चाहत्यांनी सुरू केली. शाहरुखनंतर आता 'वानरास्त्र'च्या भूमिकेसाठी आर्यन खानची अशी क्रेझ पाहायला मिळत आहे. बरं, तुम्हाला ब्रह्मास्त्र 2 मध्ये आर्यन खान बघायचं आहे का? नक्की सांगा...