Navratri 2022 : देवीच्या श्रद्धेपेक्षाही अभिनेत्रींचं बोल्ड लूकला प्राधान्य; पाहा Video

या अभिनेत्रींच्या लूकची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

Updated: Oct 3, 2022, 01:14 PM IST
Navratri 2022 : देवीच्या श्रद्धेपेक्षाही अभिनेत्रींचं बोल्ड लूकला प्राधान्य; पाहा Video title=

मुंबई : देशभरात दुर्गापूजा साजरी केली जाते. या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. अनेक बंगाली सौंदर्यवती बी-टाऊनमध्ये आपला ठसा उमटवत आहेत. अशा परिस्थितीत दरवर्षी या अभिनेत्री दुर्गापूजेच्या पंडाला दुर्गा पंडालमध्ये पोहोचतात आणि भक्तीच्या रंगात रंगलेल्या दिसतात. यावेळीही दुर्गा पंडालमध्ये हजेरी लावण्यासाठी बॉलिवूडच्या नायिका एकापेक्षा एक प्रेक्षणीय लूकमध्ये पोहोचल्या आणि येथून त्यांचे लूक सोशल मीडियावर चर्चेचे ठरले.

बातमीची लिंक : 'या' बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीनं पळून जाऊन दिग्दर्शकाशी केलं लग्न!

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचा (Rani Mukherjee) लूक यावर्षी सर्वाधिक पसंतीस उतरलेल्या लूक्सपैकी एक आहे. राणी मुखर्जी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या बंगाली सिल्क साडीत अतिशय सुंदर अंदाजात दुर्गा पंडालमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली. चोकर, बिंदी आणि गजरासोबत राणीने तिचा लूक पूर्ण केला.

बातमीची लिंक : लेकाच्या 'त्या' कृतीवर काजोल म्हणते, 'चुका होतात पण...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री काजोलही (Kajol) तिचा मुलगा युग देवगणसोबत (Kajol's Son Yug) दरवर्षीप्रमाणे यंदाही पूजा करण्यासाठी पोहोचली. काजोल आणि युगनं पंडालमध्ये आलेल्या लोकांना जेवण वाढलं. यादरम्यान आई-मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांना खूप आवडला आहे.

आणखी वाचा : 'Bigg Boss Marathi' च्या नव्या पर्वाला प्रेमाचा तडका; पाहा रुचिरा आणि रोहितची Pyaar Wali Love Story

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बॉलिवूड अभिनेत्री तनिषा मुखर्जीनं (Tanisha Mukherjee) यावेळीही पंडालमध्ये ग्लॅमर अंदाजात दिसली. तनिषानं ऑर्गेन्झा साडीत दिसली. त्याचवेळी सर्वांच्या नजरा तिच्या बॅकलेस ब्लाउजवर खिळल्या. यासोबतच तनिषानं तिचा लूक हेवी चोकर आणि हाय बनसह पूर्ण केला.

बातमीची लिंक : दोन्ही किडनी निकामी, उपचारासाठीही पैसे नाहीत; अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चित्रपट निर्माता अयान मुखर्जी (Ayan Mukherjee) देखील बंगाली आहे आणि दरवर्षी दुर्गा पूजा करण्यासाठी दुर्गा पंडालमध्ये पोहोचतो. यावर्षीही 'ब्रह्मास्त्र' रिलीज झाल्यानंतर अयान मुखर्जी दुर्गा पंडालवर पोहोचला.

आणखी वाचा : 'माझ्या एका हातात राधिका तर, दुसऱ्या...', सैफ अली खानचं वक्तव्य चर्चेत

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'मस्तराम' मधील अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून चाहते हैराण, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री आणि कॉमेडियन सुनोमा चक्रवर्तीच्या (Sumona Chakravarti) लूकवरही सर्वांच्या नजरा खिळल्या होत्य. पिवळ्या रंगाच्या बंगाली साडीत सुमोना सुंदर दिसत होती. यासोबत तिनं लाल हॉल्टर नेक ब्लाउजसह तिचा लूक पूर्ण केला.