मुंबई : आजच्या दिवसांत महिला कोणत्याच ठिकाणी सुरक्षित नाही. स्वतःच्या घरात देखील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. असाचं प्रकार घडला आहे हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शेरॉन स्टोन सोबत. शेरॉन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मुलाखतींच्या माध्यमातून तिच्या जीवनात घडलेल्या वाईट प्रसंगांचा खुलासा करते. तिच्या खासगी जीवनातील एका धक्कादायक घटनेचा खुलासा तिने 'द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस' या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.
शेरॉन म्हणते की, तिचा आणि लहान बहिणीचा त्यांच्याच आजोबांकडून लैंगिक शोषण करण्यात आला. जेव्हा शेरॉन फक्त 11 वर्षांची होती तेव्हा तिचे आजोबा क्लॅरेंस लॉसनने तिचं शारीरिक शोषण केलं. फक्त माझचं नाही तर माझ्या आजोबांनी लहान बहिणीसोबत देखील हे कृत्य केलं. असं तिने पुस्तकात लिहिलं आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे सर्व गोष्टींमध्ये तिच्या आजीने आजोबांची मदत केली होती. शेरॉनची आजी तिला आणि लहान बहिण केली आजोबांच्या खोलीत बंद करायची. अखेर काही वर्षांनंतर तिच्या आजोबांचं निधन झालं... असं अनेक प्रसंग शोरॉनने पुस्तकात लिहिलं आहे.
शेरॉननं 'द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस' या पुस्तक मंगळवारी प्रकाशित केलं. शेरॉन तिच्या नव्या पुस्तकामुळे तुफान चर्चेत आहे. तिने या पुस्तकामध्ये तिच्या आयुष्यातील अनेक चांगल्या-वाईट गोष्टींचा, अनुभवांचा खुलासा केला. शेरॉनने इन्स्टाग्रामवर पुस्तकाबाबत एक पोस्ट शेअर केली.