CID मालिकेमुळे मिळाली Sharad Kelkar ला आयुष्यभराची साथीदार

Sharad Kelkar Love Story : शरद केळकरला कशी त्याची पत्नी भेटली कसं त्यांचं सुत जुळलं आणि त्यांच्या लव्ह स्टोरीसाठी CID ही मालिका कशी जबाबदार हे तुम्हाला माहितीये का? चला तर आज त्याची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली ते जाणून घेणार आहोत. 

Updated: Apr 2, 2023, 06:30 PM IST
CID मालिकेमुळे मिळाली Sharad Kelkar ला आयुष्यभराची साथीदार title=
(Photo Credit : Sharad Kelkar Instagram)

Sharad Kelkar Love Story : लोकप्रिय मराठी अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) आज बॉलिवूडमध्ये देखील काम करताना दिसतो. शरदनं आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लक्ष्मी या चित्रपटात तर त्यानं तृतीयपंथीची भूमिका साकारली होती. शरद केळकर अखेरीस हर हर महादेव या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत दिसला होता. शरद केळकरनं त्याच्या दमदार अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली असली तर त्याच्या पर्सनॅलिटीला आजही तरुणींच्या तो स्वप्नात असतो. 

लाखो तरुणींचा हृदयाचा ठोका चुकवनाऱ्या या हँडसम हंकच्या हृदयाचा ठोका 17 वर्षांपूर्वीच एका सुंदर तरुणीने चुकवला होता. ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची पत्नी आणि अभिनेत्री कीर्ती गायकवाड. शरद केळकर आणि कीर्ती हे इंडस्ट्रीमधील क्युट कपल म्हणून ओळखले जातात. शरद केळकर आणि कीर्ती यांची  लव्ह स्टोरी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर लव्ह स्टोरींपैकी एक आहे. हे क्युट कपल कसे एकमेकाना भेटली याची फिल्मी स्टोरी आज  आपण जाणून घेणार आहोत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तुम्ही शरद आणि कीर्तीला  झी टीव्ही वरिल 'सात फेरे' या मालिकेत एकत्र पहिले असेल, पण या दोघांची पहिली भेट 2004 साली दूरदर्शनवरचा 'आक्रोश' या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्या सेटवरूनच या दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली. त्यानंतर मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. पण त्याचं कारण ठरलं CID मालिका.

CID च्या सेट वर या दोघांची दुसऱ्यांदा भेट झाली पण हा काळ कीर्तीचा या स्ट्रगल पिरियड होता. कीर्ती कामाचा शोधात होती. तिला CID या मालिकेचा भाग व्हायचे होते. त्यासाठी ऑडिशन देखील दिले होते. शरद आधीपासून CID मालिकेत इन्स्पेक्टर जेहान ही भूमिका साकारत होता. ऑडिशननंतर कीर्तीची या मालिकेत निवड झाली. पण शूट सुरु होण्यापूर्वीच अचानक काही कारणास्तव कीर्तीला रिप्लेस करण्यात आले. या गोष्टीमुळे कीर्ती डिप्रेशनमध्ये गेली. ती  इतकी निराश झाली की तिने तिच्या गावी कानपूरला परत जाण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हाच तिचा मित्र शरद पिक्चरमध्ये आला. शरदने या काळात कीर्तीला सावरले... नैराश्येतून बाहेर पडण्यास त्यानं मदत केली. इतकंच काय तर तिला कानपुरला जाण्यापासून रोखले. कठीण काळात जवळ आलेल्या या मित्रांमध्ये हळूहळू प्रेमाचे सूत जुळू लागले होते. या यादरम्यान त्यांचा भेटी वाढू लागल्या...  

हेही वाचा : चित्रपट फ्लॉप झाला म्हणून Kapil Sharma ने स्वत:ला संपवण्याचा केला होता विचार, आज आहे 300 कोटींच्या संपत्तीचा मालक

या 4-5 महिन्यचा भेटींमदरम्यान या दोघांना आपण प्रेमात असल्याची जाणीव झाली पण या दोघांनी कधीच एकमेकांना आपल्या प्रेमाचा भावना व्यक्त केल्या नाही. चार पाच महिने रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनाही वाटत होती की आम्ही दोघे एकमेकांसाठीच बनलो आहोत.त्यामुळे दोघांनी लवकरात लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला..

कीर्तीला CID ही मालिका मिळाली नाही पण या मालिकेमुळे आयुष्यभराचा जोडीदार मात्र नक्की मिळाला... दोघांनी मराठी असल्याने त्यांचा लग्नात कसलीच अडचण आली नाही. काही महिने रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी आई-वडिलांच्या संमतीनं 3 जून 2005 रोजी दोघं विवाहबंधनात अडकले. तर 2014 साली कीर्तीनं एका मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचे नाव केशा असे आहे.