लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात लोकप्रिय अभिनेत्रीची Pregnancy Announcement?

Shamna Kasim: बॉलिवूडमध्ये सध्या बेबी बंप, प्रेग्नन्सी (pregnancy in bollywood) आणि गूड न्यूज सारखे शब्द खूप ट्रेण्ड होत आहेत. सध्या बिपाशा बासू, आलिया भट्ट अशा लोकप्रिय अभिनेत्रींनंतर तसेच देबिना बॅनर्जीनंतर (debina benerjee) आता अजून एका अभिनेत्रीनं गुडन्यूज दिली आहे. 

Updated: Jan 1, 2023, 01:33 PM IST
लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात लोकप्रिय अभिनेत्रीची Pregnancy Announcement?  title=

Shamna Kasim: बॉलिवूडमध्ये सध्या बेबी बंप, प्रेग्नन्सी (pregnancy in bollywood) आणि गूड न्यूज सारखे शब्द खूप ट्रेण्ड होत आहेत. सध्या बिपाशा बासू, आलिया भट्ट अशा लोकप्रिय अभिनेत्रींनंतर तसेच देबिना बॅनर्जीनंतर (debina benerjee) आता अजून एका अभिनेत्रीनं गुडन्यूज दिली आहे. टेलिव्हिजन क्षेत्रातही सध्या अनेक सेलिब्रेटी आईबाबा होताना दिसत आहेत. त्यातच आता अजून एका लोकप्रिय अभिनेत्रीनं इन्टाग्रामवरून ही गूड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे. या आलिया भट्ट, सोनम कपूर आणि बिपाशा बासू अशा अभिनेत्रींनंतर आता आणखी एक अभिनेत्री आता लवकरच आई होणार आहे. साऊथ इंडियन एक्ट्रेस शमना कासिमनं आपली प्रेग्नंन्सी जाहीर केली आहे.

आपल्या लग्नाच्या तीन महिन्यानंतरच (south indian actress) तिनं आपली प्रेग्नन्सी जाहीर केली आहे. इन्टाग्रामवर तिनं एक पोस्ट प्रसिद्ध केली आहे ही सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहे. त्यात ती अगदी आत्मविश्वासानं आपलं बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसते आहे. त्याचसोबतच तिनं नुकताच एक युट्यूब व्हिडीओ (Shamna kasim video) प्रसिद्ध केला आहे. ज्यात ती आपल्या प्रेग्नेन्सीबद्दल सांगते आहे, तिचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 

कोण आहे शमना कासिम? 

अभिनेत्री शमना कासिमने 24 डिसेंबर 2022 रोजी बिझनेसमन शानिद आसिफ अलीसोबत लग्न केलं. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर या लोकप्रिय अभिनेत्रीनं आपली ही गूड न्यूज आपल्या चाहत्यांसमवेत शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यावर आपल्या चाहत्यांचे तिनंही यावेळी आभार मानले आहेत. शमनानं दुबईमध्ये आपला विवाहसोहळा (marriage) मोठ्या जंगी प्रमाणात केला होता. तिच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर तीही आपल्या चाहत्यांना अपडेट ठेवत असते. शमना कासिम आणि तिचा प्रियकर शनिद या दोघांच्या जोडीला नेटकऱ्यांनी भरपूरनं कौतुक केलं आहे. 2023 मध्ये आपल्या प्रेग्नंन्सीची पहिली गुडन्यूज (good news) देणारी ही अभिनेत्री आहे.  

2023 मधील पहिली प्रेग्नन्सी अनाऊंटमेंट? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मागील वर्षी सोनम कपूर, आलिया भट्ट आणि बिपाशा बासू यांनी आपल्या प्रेग्नन्सींची अनाऊंसमेटं केली होती. आता या अभिनेत्रींनी आपल्या बाळाला जन्म दिला आहे. सध्या या अभिनेत्री आपलं पोस्ट प्रेग्नंन्सी लाईफ एन्जॉय करत असून आपलं आईपणही अनुभवत आहेत. येत्या काळातही बॉलिवूडमध्ये अशाच अनेक गूडन्यूज मिळण्याची शक्यता आहे.