साथीच्या आजारात पत्नी गेल्यानंतर धक्क्यातून असे सावरले अभिनेते शम्मी कपूर

शम्मी कपूर यांनी प्रसिद्ध अभिनेत्री गीता बाली यांच्यासोबत लव्हमॅरेज केलं होतं.

Updated: May 11, 2021, 02:34 PM IST
साथीच्या आजारात पत्नी गेल्यानंतर धक्क्यातून असे सावरले अभिनेते शम्मी कपूर title=

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत सामील असलेल्या अभिनेत्री मुमताज आजही आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात आहेत. अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. ६० ते ७०च्या दशकात मुमताज यांनी बॉलिवूडवर राज्य केलं. त्यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केलं. तर दुसरीकडे, शम्मी कपूर बॉलिवूडमध्ये एक रोमँटिक हिरो म्हणून खूप लोकप्रिय होते. शम्मी कपूर यांनी प्रसिद्ध अभिनेत्री गीता बाली यांच्यासोबत लव्हमॅरेज केलं होतं. मात्र, त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि गीता बाली यांचं कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते.

यामुळे या दोघांनीही मंदिरात जावून गुपचूप लग्न केलं. लग्नानंतर शम्मी कपूर गीता बाली यांना थेट घरात घेऊन गेले. त्यानंतर या दोघांच्या कुटुंबियांनी लग्नाला सहमती दर्शविली. शम्मी आणि गीता यांना दोन मुलं झाली. त्यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली आणि गीता यांना देवी या साथीच्या आजारानं गाठलं यामुळे त्यांचा मृत्यू झाला. 21 जानेवारी 1965 रोजी त्यांचं निधन झालं

गीता यांच्या निधनानंतर शम्मी कपूर यांना खूप मोठा धक्का बसला. या  धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणं सुरूच ठेवलं. त्यांच्या घरातील सदस्यांची त्यांनी पुन्हा लग्न करावं अशी त्यांची इच्छा होती. कारण त्यांची मुलं बरीच लहान होती. शूटिंगमुळे शम्मी सहसा शहराबाहेर असायचे. प्रत्येकाचा असा विश्वास होता की, जर त्यांचं लग्न झालं तर त्यांच्या मुलांना नवीन आई मिळेलं. त्या मुलांना आईचं प्रेम मिळेल. पण शम्मी लग्नासाठी तयार नव्हते.

त्या दिवसांत शम्मी मुमताजसोबत 'ब्रह्मचारी' या चित्रपटाचं शूटिंग करत होते. 'ब्रह्मचारी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मुमताज यांनी शम्मी कपूरला सांगितलं की, 'मी तुमच्यावर फिदा झाली आहे. तुम्ही माझं पहिलं क्रश आहात. हे ऐकून शम्मी यांना बरं वाटलं. त्यानंतर त्यांचाही कल मुमताज यांच्याकडे जावू लागला. बॉलिवूड कॉरिडोरमध्ये दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगू लागल्या. दोघंही ऐकमेकांच्या खूप जवळ आले होते. एक दिवस शम्मी यांनी मुमताज यांना लग्नासाठी विचारलं.

सोबतही त्यांना सांगितलं की, लग्नानंतर तुम्हाला सिनेमात काम करता येणार नाही. तर घरीच राहून आपल्या मुलांची काळजी घ्यावी लागेल. त्यावेळी मुमताज 18 वर्षांच्या होत्या आणि बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत होत्या. शम्मी यांची ही ऑफर ऐकून त्या स्तब्ध झाल्या होत्या.

शम्मी मुमताज त्यांच्यापेक्षा 16 वर्षांनी मोठे होते. वयाचं हे अंतर आणि समोर असलेलं करिअर. या सगळ्याचा विचार केल्यानंतर मुमताज यांनी शम्मी यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. शम्मी मुमताज यांच्या उत्तराने तुटून गेले. यानंतर त्यांनी कोणत्याही अभिनेत्रीसोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि नीला देवीशी यांच्यासोबत लग्न केलं.