लग्नाआधीचं होणाऱ्या पतीच्या मिठीत अभिनेत्री, रोमँटिक फोटोंची सर्वत्र चर्चा

बोल्डनेससाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीच्या रोमँटिक फोटोंची सर्वत्र चर्चा, कोण आहे ती अभिनेत्री?   

Updated: Mar 15, 2022, 03:23 PM IST
लग्नाआधीचं होणाऱ्या पतीच्या मिठीत अभिनेत्री, रोमँटिक फोटोंची सर्वत्र चर्चा title=

मुंबई : अभिनेत्री शमा सिकंदर सध्या लग्नामुळे तुफान चर्चेत आली आहे. बोल्डनेससाठी प्रसिद्ध असलेल्या शमा सिकंदरने लग्नाआधीच होणाऱ्या पतीसोबत काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अत्यंत बोल्ड आणि हॉट दिसत आहे. पतीसोबतच्या बोल्ड आणि रोमँटिक फोटोमुळे शमा चर्चेत आली आहे. शमा सिकंदरच्या स्टाइलचे इंटरनेटवर खूप कौतुक होत आहे. शमाने तिच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे दोन फोटो शेअर केले आहेत.

शमा सिकंदर

सोमवारी शमाने बॉयफ्रेंड जेम्स मिलेरनसोबत लग्न बंधानात अडकली आहे. शमाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये हे कपल रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे.

शादी

शमा सिकंदरला टीव्ही शो 'ये मेरी लाईफ है'च्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली होती. या शोमध्ये ती खूपच सिंपल भूमिकेत दाखवण्यात आली होती. शमाने या शोमध्ये पूजा मेहताची भूमिका करत घराघरात आपली ओळख निर्माण केली होती.

प्री वेडिंग

सोबतच शमाने 'धूम धडाका', 'अंश: द डेडली पार्ट', 'मन', 'प्रेम रतन' आणि 'कॉन्ट्रॅक्ट' सारख्या सिनेमांत काम केलं आहे. छोट्या पडद्यावर 'बालवीर', 'सेवन', 'पॉपकॉर्न न्यूज', 'सीआयडी' आणि 'काजल' सारख्या शोजमध्ये शमाने भूमिका केली आहे.