मुंबई : अनेकदा लोकं असं म्हणतात की बदनामी झाली तरी लोकं काही वर्षांनी विषसरतात. हे पण खरं नाही. तुम्ही केलेली चूक लोकं अनेक वर्ष लक्षात ठेवतात आणि वेळ आली की तुम्हाला ती ऐकवून देखील दाखवतात. असंच काहीस 66 वर्षांच्या शक्ती कपूरसोबत झालं आहे.
एका कार्यक्रमात शक्ती कपूर यांना तनुश्री दत्ता - नाना पाटेकर प्रकरणाबद्दल विचारलं असता त्यांनी त्या प्रश्नाला हास्यास्पद उत्तर दिलं. आणि हेच हसणं आता शक्ती कपूर यांना महागात पडलं आहे. काही लोकांनी शक्ती कपूर यांना असंवेदनशील वडिल म्हटलं तर काहींनी शक्ती कपूर यांना आपलंच चूक काम आठवून दिलं.
या प्रकरणानंतर लोकांनी शक्ती कपूरला अनेक टिका केल्या. 2004 मध्ये घडलेलं एक स्टिंग देखील लोकांनी शक्ती कपूर यांना आठवून दिलं. तसेच 2005 मधील सेक्स स्कँडल देखील शक्ती कपूर यांना आठवून दिलं. तसेच काहींनी प्रश्न विचारला की, तनुश्रीच्या जागी तुमची मुलगी श्रद्धा कपूर असती तर?