बिग बॉस 16 मध्ये दिसणार शकीरा?,प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

सलमान खानच्या बिग बॉस 16 शोमध्ये दिसणार शकीरा?

Updated: Sep 25, 2022, 01:33 PM IST
 बिग बॉस 16 मध्ये दिसणार शकीरा?,प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला  title=

मुंबई : येत्या 1 ऑक्टोबरपासून बिग बॉसच्या 16 व्या (Bigg Boss 16) सीझनला सुरुवात होणार आहे. यापुर्वी या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या कंटेस्टंटची नावे चर्चेत आली आहे. या चर्चेत जन्नज जुबेर, टीना दत्ता, राज कुंद्रा यांसारख्या स्टार्सची नावे चर्चेत आहे. यात आणखीण एक नाव चर्चेत आले ते म्हणजे, शकीरा, पॉपस्टार शकीरा (Shakira). आता ही तीच शकीरा आहे का, जिने संपुर्ण जगाला 'वाका वाका' गाण्यावर थिरकायला लावले होते, हेच जाणून घेऊयात. 

बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये सहभागी होणार्‍या स्पर्धकांबाबत एकामागून एक नवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे बिग बॉसच्या स्पर्धकांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. त्यात आता ताज्या माहितीनुसार शकीरा (Shakira) या सीझनमध्ये सहभागी होणार आहे. मात्र ही शकीरा पॉपस्टार नसून भारतीय डान्सर आहे. त्यामुळे ही भारतीय शकीरा कोण आहे? अशी चर्चा आता प्रेक्षकांमध्ये सुरु झाली आहे.

कोण आहे शकीरा?
बिग बॉस 16 मध्ये (Bigg Boss 16) प्रसिद्ध हरियाणवी नृत्यांगना गोरी नागोरी (Gori Nagori)  देखील सहभागी होणार आहे. गोरी नागोरीची ओळख केवळ हरियाणामध्येच नाही तर राजस्थान, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये देखील आहे. गोरी नागोरी यांना राजस्थानची शकीरा म्हणूनही ओळखले जाते. या शकीराची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

कुटूंबाचा होता विरोध 
गोरी नागोरीचे (Gori Nagori) खरे नाव तस्लिमा बानो आहे. तिने 9 वर्षांची असतानाच डान्स करायला सुरुवात केली होती. तिच्या या डान्सला कुटुंबाचा विरोध होता. कालांतराने तिची प्रतिभा पाहून कुटुंबानेही तिला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. आज गोरी नागोरी सपना चौधरीप्रमाणेच (Sapna Choudhary) तिच्या डान्सने धुमाकुळ घालत आहे. गोरी नागोरीचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. 

बिग बॉस 16 च्या कंटेस्टंटमध्ये गोरी नागोरीचे (Gori Nagori) नाव चर्चेत आहे. त्यामुळे गोरी नागोरीला बिग बॉसमध्ये पाहण्यासाठी चाहते आता आतुरतेने वाट पाहत आहेत.