पतीमुळे दिशा वाकानीचं करिअर उद्ध्वस्त? 'दयाबेन'ची अवस्था पाहून संतापले चाहते

तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो सध्या सर्वात जास्त आवडला जाणारा टीव्ही शो आहे. 

Updated: Aug 30, 2022, 03:52 PM IST
पतीमुळे दिशा वाकानीचं करिअर उद्ध्वस्त? 'दयाबेन'ची अवस्था पाहून संतापले चाहते title=

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो सध्या सर्वात जास्त आवडला जाणारा टीव्ही शो आहे. शोमध्ये दिसणारी प्रत्येक व्यक्तिरेखा आज चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. दयाबेनबद्दल बोलायचं झालं तर तिच्याबद्दल तोड नाही. या  मालिकेत अभिनेत्री दिशा वाकाणीने दयाबेनची भूमिका साकारली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती या शोचा भाग नसली तरी या अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत अद्याप कोणतीही घट झालेली नाही. 

दिशा वकानीला शो सोडून जवळपास पाच वर्षे झाली आहेत. पण तिचे चाहते अजूनही तिच्या परतीची वाट पाहत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पाहून तिचे चाहते चांगलेच संतापले आहेत. वास्तविक तिच्या एका चाहत्याने तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका मुलासोबत दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिशाची प्रकृती खूपच वाईट दिसत आहे. यानंतर चाहत्यांनी तिच्या वाईट अवस्थेसाठी पतीला जबाबदार धरून संताप व्यक्त केला आहे.  

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये दिशाला नो मेकअप लूकमध्ये ओळखणं कठीण आहे. याशिवाय तिचे वजनही पूर्वीच्या तुलनेत खूप वाढलेलं दिसून येत आहे. खरंतर तिला पाहून कोणीही म्हणू शकत नाही की, ती तारक मेहता का उल्टा चष्माची दयाबेन आहे.

फोटो पाहून चाहते म्हणत आहेत की दिशाच्या वाईट अवस्थेला तिचा नवरा जबाबदार आहे आणि तिच्या पतीमुळेच तिची कारकीर्द उद्ध्वस्त झाली आहे. एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं आहे की, "तिच्या पतीने तिचं करिअर बरबाद केलं." दुसर्‍या युजरने संताप व्यक्त करत लिहिलं की, "अभिनेत्री पती आणि मुलामध्ये अडकून बसली आहे.''