शाहरूख खानने शेअर केला चाहत्यांसोबत आगामी चित्रपटातील खास लूक

  बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानने नुकताच त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाचे सेलिब्रेशन केल्यानंतर आता एसआरके पुन्हा कामावर रूजू झाला आहे. 

Updated: Nov 6, 2017, 10:45 AM IST
शाहरूख खानने शेअर केला चाहत्यांसोबत आगामी चित्रपटातील खास लूक  title=

मुंबई :  बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानने नुकताच त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाचे सेलिब्रेशन केल्यानंतर आता एसआरके पुन्हा कामावर रूजू झाला आहे. 

शाहरूख खानला त्याच्या चाहत्यांकडून सतत एक मागणी होत होती. त्यानुसार चाहत्यांची इच्छा पूर्ण करताना त्याने रिटर्न गिफ्टच्या स्वरूपात ही इच्छा पूर्ण केली आहे. 

काय आहे रिटर्न गिफ्ट ? 
शाहरूख खानने त्याच्या आगामी  चित्रपटातील खास लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. चित्रपटाचे नाव अजूनही ठरले नसले तरीही हा चित्रपट आनंद एल. राय बनवणार आहेत. शाहरूखने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. 

 

आनंद एल रायच्या या चित्रपटाच्या शूटिंगची वाट पाहत आहे. शाहरूख खानसोबत या चित्रपटामध्ये कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा लीड रोलमध्ये दिसणार आहेत. 
शाहरूख खानने ट्विटरवर ३० लाख फॉलोवर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. हे औचित्य साधत शाहरूखने ब्लॅक शर्ट मधील चॉकलेट बॉय लूकमधील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. 

शाहरूख खानने हा फोटो पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावरही तो झपाट्याने व्हायरल होत आहे. या चित्रपटामध्ये शाहरूख, कॅटरिना, अनुष्कासोबत काही इतर स्टार्सदेखील लहान पण खास भूमिकांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये सलमान खान, अलिया भट, दीपिका पादुकोण आणि इतर काही मोठे स्टार्स कॅमियो करताना दिसणार आहेत.