'या' प्रसिद्ध अभिनेत्याकडून हॉटेलमध्ये चोरी केल्याची कबुली

अभिनेत्याचं हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

Updated: Mar 9, 2022, 06:55 PM IST
'या' प्रसिद्ध अभिनेत्याकडून हॉटेलमध्ये चोरी केल्याची कबुली title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला इंडस्ट्रीचा किंग खान म्हटलं जातं. शाहरुखला त्याचे फॅन्स बॉलिवूडचा बादशाहा या नावाने देखील ओळखतात. शाहरुखकडे दौलत आणि प्रसिद्धीची काहिच कमी नाहीये. मात्र करोडोंचा मालक असलेला शाहरुख नेहमी हॉटेल रुममधून चॉकलेट चोरुन आणतो.

याचा खुलासा खुद्द शाहरुखनेच मुलाखतीदरम्यान केला आहे. खरंतर सध्या शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ साजिद खान आणि रितेश देशमुख यांच्या टॉक शो दरम्यानचा आहे. जिथे हे स्टार्स शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांची मुलाखत घेताना दिसत आहेत.

मुलाखतीदरम्यान साजिद खान शाहरुख खान आणि अनुष्काला विचारतो की, तुम्ही कधी कोणाकडे डिस्काउंन्ट मागितलं आहे का? यावंर शाहरुख नाही म्हणतो, पण अभिनेता पुढे म्हणतो की, कधी-कधी मी हॉटेलमधून एक-दोन गोष्टी उचलतो. टूथब्रश, छोटा साबण इ. शाहरुख पुढे म्हणाला की, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये चॉकलेट्स असतात, यावर अनुष्का म्हणते की, तुम्ही ती चॉकलेट पैसे देवून विकत घेवू शकता.

यावर शाहरुख म्हणाला, मला माहीत आहे पण फुकटात मिळालं तर बरं वाटतं. यावंर शाहरुख पुढे म्हणाला की, जेव्हा मी खोलीतून बाहेर पडतो तेव्हा लोकं फोटो काढण्यासाठी उभे राहतात. तेव्हा मी हवेत असं बोलतो की, माझ्यातील गिल्ट कॉन्शस कमी करण्यासाठी ते मी काहितरी ईथून घेतलं आहे. ते तुम्ही बघून घ्या हा!...