...म्हणून शाहरुख आहे अक्षयचा जबरदस्त फॅन!

 बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा अभिनेता अक्षय खन्नाच्या अभिनयाचा जबरदस्त फॅन आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 28, 2017, 10:21 PM IST
...म्हणून शाहरुख आहे अक्षयचा जबरदस्त फॅन! title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा अभिनेता अक्षय खन्नाच्या अभिनयाचा जबरदस्त फॅन आहे. १९६९ मध्ये यश चोप्रा यांचा ‘इत्तेफाक’ हा सिनेमा आला होता. त्याचाच आता रिमेक होत आहे. यात अक्षय खन्ना, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खान, करण जोहर आणि रेणू रवी चोप्रा यांनी एकत्रितपणे केली आहे. 

याबद्दल शाहरुख खान म्हणतो की, "अक्षयचा काही अंदाज नाही आणि हाच चित्रपटाचा सकारात्मक भाग आहे. वैयक्तिकरित्या मला असे वाटते की, अक्षय व्यतिरिक्त ही भूमिका दुसरं कोणीही करू शकतं नाही. चित्रपटात सिद्धार्थ आणि सोनाक्षीने अक्षयचे चरित्र खुलेपणाने मांडले आहे, ज्यामुळे त्यांची अभिनय क्षमता खुलून आली आहे. त्याने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका जबरदस्त निभावली आहे."

पुढे शाहरुख म्हणाला की, "मी अक्षय आणि त्याच्या अभिनय क्षमतेचा पूर्वीपासूनच फॅन आहे. त्याचे काम मला नेहमीच भावते."

‘इत्तेफाक’ हा चित्रपट ३ नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.