Shahrukh Khan ची मुलगी सुहानावर का आली शहर सोडण्याची वेळ?

आर्यन खाननंतर शाहरूखची मुलगी चर्चेत, नक्की काय आहे कारण?   

Updated: Nov 25, 2021, 11:22 AM IST
Shahrukh Khan ची मुलगी सुहानावर का आली शहर सोडण्याची वेळ?  title=

मुंबई : अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान अभिनेत्री नसली तरी सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सुहान स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. काही दिवसांपूर्वी भाऊ आर्यन खानमुळे सुहाना चर्चेत आली. जेव्हा आर्यन जेलमध्ये होता तेव्हा सुहानाने भारतात येण्याचा निर्णय घेतला. पण भरतात येण्यास तिला नकार दिला. आता आर्यनची सुटका झाल्यानंतर सुहाना भारतात येणार असल्याचं कळत आहे. 

खुद्द सुहानने सोशल मीडियावर पोस्ट करत ती न्यूयॉर्क सोडत असल्याची हिंट दिली आहे. सुहानाने एक फोटो पोस्ट केला आहे. एका ट्रकवर लिहिलं आहे की, 'काळजी करू नका... तुम्ही न्यूयॉर्क सोडत असाल तरी तुम्ही कायम न्यूयॉर्कर राहाल...' पण सुहानने पोस्टला कॅप्शन दिलेलं नाही. तिने फक्त हार्टब्रेक इमोजी पोस्ट केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुहानाच्या पोस्टवर तिच्या मित्रमंडळींनी कमेन्ट केल्या आहेत. तिचा एक मित्र म्हणाला, 'तू आता आणखी चांगलं काम करशील...' तर दुसऱ्याने सुहानाला 'गुड लक गर्ल' म्हटलं आहे. तर काहींनी मात्र निराशा व्यक्त केली आहे. सुहानाची सोशल मीडियापोस्ट आणि कमेन्टवरून ती न्यूयॉर्क सोडून मायदेशी परत येणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.