शाहरुखच्या लेकीच्या बेडरुममध्ये हा व्यक्ती कोण? फोटो व्हायरल

सुहानाचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Updated: Mar 8, 2022, 06:04 PM IST
 शाहरुखच्या लेकीच्या बेडरुममध्ये हा व्यक्ती कोण? फोटो व्हायरल title=

मुंबई : शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सुहाना तिच्या पार्टीपासून ते व्हेकेशनपर्यंतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

अलीकडेच सुहानाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. सुहानाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर मन्नतमधील एक इनसाइड फोटो शेअर केला आहे. 

सुहाना खानच्या या बेडरुम फोटोची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. फोटोमध्ये सुहानाचा बेडरूम दिसत आहे .ज्यामध्ये नाईट लॅम्प लावण्यात आले आहे.शाहरुखच्या लेकीच्या बेडरुममध्ये हा व्यक्ती कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. 

बेडवर, अब्राहम त्याच्या आयपॅडवर गेम खेळत आहे. सुहानाचा कुत्रा बाजूला खुर्चीवर झोपला आहे.  

On Shah Rukh Khan's daughter Suhana Khan's birthday, scroll through her  glamourous pics! | People News | Zee News

बेडरूमच्या बाहेर एक मोठी बाल्कनी आहे, जेथून समुद्र दिसत आहे. सुहानाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तिने मन्नतमधील कधी न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा लहान भाऊ अबराम खान आणि एक कुत्रा दिसत आहे.

सुहानाला इंस्टाग्रामवर 2.4 मिलियन लोक फॉलो करतात. शाहरुखच्या लाडक्या मुलीने भलेही चित्रपटांमध्ये पदार्पण केले नसेल, पण तिची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सुहानाचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.