'अ‍ॅनिमल पार्क' मध्ये 'कबीर सिंह' ची एंट्री? शाहिदच्या एका विधानामुळं चर्चांना उधाण

'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटावर आता अभिनेता शाहिद कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Feb 1, 2024, 03:49 PM IST
'अ‍ॅनिमल पार्क' मध्ये 'कबीर सिंह' ची एंट्री? शाहिदच्या एका विधानामुळं चर्चांना उधाण title=

Shahid Kapoor On Animal Park : संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' (Animal) हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन आणि इंटिमेट सीनदेखील चांगलेच गाजले. या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काहींना हा चित्रपट आवडला, तर काहींनी यावर टीका केली. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटावर आता अभिनेता शाहिद कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. 

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा कबीर सिंह हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटात शाहिदने कबीर ही भूमिका साकारली होती. या भूमिकेचे प्रचंड कौतुक पाहायला मिळाले. तसेच 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाप्रमाणेच शाहिदच्या कबीर सिंह चित्रपटालाही टीकेचा सामना करावा लागला. आता 'अ‍ॅनिमल' चित्रपटानंतर 'अ‍ॅनिमल पार्क' या चित्रपटातील रणविजय आणि कबीर सिंह चित्रपटातील कबीर हे जर एकत्र झळकले तर काय होईल, असा प्रश्न अभिनेता शाहिद कपूरला विचारण्यात आला. यावर शाहिदने हटके उत्तर दिले आहे. 

शाहिद कपूर काय म्हणाला?

यावेळी शाहिद म्हणाला, "रणविजय आणि कबीर यांची एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. कारण काही गोष्टी या प्रेक्षकांसाठी फारच महत्त्वपूर्ण असतात. रणविजय आणि कबीर एकत्र येणं हे माझ्या हातात नाही. त्याबरोबरच हे फार सोपंही नाही. कारण हे दोन्ही कलाकार वेगवेगळ्या विश्वातील आहेत. पण रणविजय आणि कबीर एकत्र आले, तर ते एका अर्थाने चांगले असेल. पण हे खरोखर शक्य आहे का, असं होऊ शकतं का आणि हे कधी होईल, या सर्व गोष्टींच्या मागे अनेक व्यवहारिक गोष्टी आहेत", असे शाहिद कपूरने सांगितले.

शाहिद कपूर हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो लवकरच 'तेरी बातों मे ऐसा उलझा जिया' या चित्रपटात झळकणार आहे. यात तो क्रिती सेनॉनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट येत्या 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 900 कोटींहून अधिकचा गल्ला जमावला होता. या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका, तृप्ती डिमरी या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते.