'My sun & moon...'; Birthday काल मात्र, शाहिदच्या पत्नीनं आज दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Shahid Kapoor : शाहिद कपूरचा काल 25 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता तर त्याची पत्नी मीरानं त्याला आज दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...

दिक्षा पाटील | Updated: Feb 26, 2024, 02:48 PM IST
'My sun & moon...'; Birthday काल मात्र, शाहिदच्या पत्नीनं आज दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! title=
(Photo Credit : Social Media)

Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा काल 25 फेब्रुवारी रोजी 43 वा वाढदिवस होता. त्याच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या. मात्र, शाहिद कपूरसाठी खास बर्थडे विश ठरली ती त्याची पत्नी मीरा राजपुतची. मीरा राजपूतनं सोशल मीडियावर त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याशिवाय तिनं हटके पद्धतीनं शाहिदला शुभेच्छा दिल्या आहेत. 

मीरानं आज 26 फेब्रुवारी रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शाहिदला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर केली आहे. मीरानं शाहिदसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा एक सेल्फी आहे. तर हा फोटो शेअर करत मीरानं कॅप्शन दिलं की माझ्या सूर्य- चंद्रला वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक सुंदर पायसीयन सूर्य आणि विर्गो चंद्र. संपूर्ण जगाचा तुझ्या आशीर्वाद आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मीरानं केलेली ही पोस्ट पाहता नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाली, 'शाहिद सर तू खूप चांगला आहेस.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुम्ही या गोष्टीवर माझ्याप्रमाणे विचार करताना की शाहिद कपूर हा नॅशन्ल क्रश आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा नॅशनल क्रश.' काही नेटकऱ्यांनी मीरानं इतकी उशिरा पोस्ट केल्यानं प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'उशिरा पण शाहिदला वाढदिवसाच्या शुभेच्छा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तू खूप उशिरा शुभेच्छा केल्या.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'या पोस्टची काल पासून प्रतिक्षा करत होतो.' 

शाहिद आणि मीरा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. शाहिद आणि मीरा विषयी बोलायचे झाले तर 2015 मध्ये त्यांनी सप्तपदी घेतल्या. त्या दोघांना दोन मुलं आहेत. ते दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते दोघे एकमेंकांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. 

हेही वाचा : विवेक ओबेरॉयनंही केलेला स्वत:ला संपवण्याचा विचार! म्हणाला, 'सुशांत सिंह राजपुतप्रमाणे...'

शाहिद सगळ्यात शेवटी 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपटानं काल रविवारी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी असलेल्या 17 व्या दिवशी 130 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटानं वर्ल्डवाइड 150 कोटींचा आकडा पार करण्याच्या जवळ आहे. या चित्रपटात शाहिद कपूर शिवाय  क्रिती सेनन, डिंपल कपाडिया आणि राकेश बेदी कलाकार पाहायला मिळाले.