लक्झरी कार, महागडे कपडे आणि बरंच काही; पाहा कसं आयुष्य जगतो आर्यन खान

आर्यनची एक स्टारकिड म्हणून यापूर्वीच वेगळी ओळख तयार झाली होती. 

Updated: Oct 6, 2021, 09:55 AM IST
लक्झरी कार, महागडे कपडे आणि बरंच काही; पाहा कसं आयुष्य जगतो आर्यन खान  title=
आर्यन खान

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अडचणी गेल्या काही काळापासून वाढतानाच दिसत आहेत. मुंबईतील क्रूझवर एनसीबीनं मारलेल्या धाडीमध्ये आर्यनला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं. पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आर्यन खान हे एकच नाव सर्वांच्या चर्चेत येऊ लागलं.

आर्यनची एक स्टारकिड म्हणून यापूर्वीच वेगळी ओळख तयार झाली होती. अभिनेता शाहरुख खानचा हा मोठा मुलगा त्याच्या आलिशान राहणीमानासाठीही ओळखला जातो. 24 वर्षांचा आर्यन लंडनमधील सेवन ऑक्स स्कूलमधून 12 वीचं शिक्षण घेऊन झाला आहे. त्याचं शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल येथून झालं आहे. आर्यननं 2020 मध्ये युनिवर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्या येथून बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स, फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोडक्शन, स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्समधून पदवी शिक्षण घेतलं आहे.

आर्यन कलाविश्वात अभिनेता म्हणून पदार्पण करण्यापूर्वीच त्याच्या फिमेल फॅन्सचा आकडा लक्ष वेधणारा आहे. त्याच्याकडे आतापासून आलिशान कारही आहेत. आर्यनकडे फरारी, बीएमडब्ल्यू आय 8 सारख्या महागड्या कार आहेत.

महागड्या कारसोबतच आर्यन महागडे कपडे घालण्यालाही पसंती देतो. एनसीबीच्या ताब्यात असतानाच त्याचा लूक बदललेला पाहायला मिळालं आहे. शाहरुख खानचा मुलगा म्हणऊन आर्यनची असणारी ओळख त्याला कायमच प्रसिद्धीझोतात आणत असते. पण, ड्रग्ज प्रकरणात नाव गोवलं गेल्यामुळं आर्यनला काही अडचणींचा सामनाही करावा लागत आहे हे नाकारता येणार नाही.