Shah Rukh Khan's Pathaan On OTT Platform : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचा 'पठाण' (Pathaan) हा चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ उलटला. तरी देखील 'पठाण'चा बॉक्स ऑफिसवर कमाईचा आकडा कमी झाला नाही. 'पठाण'नं प्रदर्शित होताच एकामागे-एक रेकॉर्ड मोडले आहेत. दरम्यान, काही प्रेक्षकांना 'पठाण' हा चित्रपट पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा आहे. हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याची प्रतिक्षा प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. आता प्रेक्षकांच्या प्रतिक्षेचा लवकरच अंत होणार आहे. 'पठाण' हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
पीपिंग मूननं दिलेल्यावृत्तानुसार, 'पठाण' हा चित्रपट 22 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, हा चित्रपट तब्बल 56 दिवस चित्रपटगृहात प्रदर्शित होता. दरम्यान, आता ही देखील चर्चा सुरु आहे की चित्रपट समिक्षकांनी जे सीन चित्रपटातून डिलीट करायला सांगितले होते ते देखील अॅमेझॉनवर पाहता येणार आहे. खरंतर डिलीटेड सीन्समध्ये 'पठाण'चं ओरिजीन पाहता येणार आहे. हे सगळं आपल्याला ओटीटीवर पाहता येऊ शकतं अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
बुधवारी यशराज फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊनसनं चित्रपट थिएटरमध्ये 50 दिवस राहिला त्यासाठी मोठं सेलिब्रेशन केलं होतं. दरम्यान, इतकंच काय तर हा चित्रपट अजूनही भारताच्या चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहे. याशिवय हा चित्रपट यूके, यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युएई सारख्या देशांमध्ये देखील चित्रपटगृहात पाहता येत आहे. 'पठाण'च्या हिंदी व्हर्जननं बॉक्स ऑफिसवर 540 कोटी कमावले. तर चित्रपटानं जगभरात कमाईच्या बाबतीत 1 हजार कोटींचा आकडा पार केला आहे.
हेही वाचा : मी एकटाच आहे, मला राग आला की...; Sunil Grover सोबतच्या 'त्या' वादावर Kapil Sharma चं वक्तव्य
पठाण या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण व्यतिरिक्त जॉन अब्राहम (John Abraham) महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटातून शाहरुख आणि जॉन अब्राहम पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले आहेत. दरम्यान, यांच्याशिवाय डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा देखील दिसणार आहे. याशिवाय चित्रपटात सलमान खाननं (Salman Khan) देखील पाहुण्या कलाकारांची भूमिका साकारली आहे. तर 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता.