आर्यन खानची चावी आतापासून शाहरुखच्या हातात, मुलासाठी तो वाटेल ते करणार?

शाहरुख खानने नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, 

Updated: Mar 15, 2022, 03:53 PM IST
 आर्यन खानची चावी आतापासून शाहरुखच्या हातात, मुलासाठी तो वाटेल ते करणार? title=

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान ओटीटीवर कधी पदार्पण करणार, याची उत्सुकता गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांना आहे. आतापासून एक वर्षापूर्वी, शाहरुख खानने त्याच्या OTT पदार्पणाचा एक टीझर व्हिडिओ शेअर केला होता, पण आता योग्य वेळ आली आहे जेव्हा किंग खान अंतिम घोषणा करेल.

शाहरुख खानने नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अ‍ॅप दाखवताना दिसत आहे,  शाहरुख खानने डिस्ने प्लस हॉटस्टारवर पदार्पण करताना काही टीझर व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.तसेच पोस्टरवर लिहिले आहे की, SRK+ 

त्यादरम्यान असे मानले जात होते की शाहरुख लवकरच एक मोठी घोषणा करणार आहे. मात्र, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर त्याने संपूर्ण प्रोजेक्ट पुढे ढकलला.

आता पुन्हा एकदा शाहरुख एका नव्या पोस्टद्वारे चाहत्यांना त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगताना दिसत आहे. पोस्टर शेअर करताना शाहरुख खानने लिहिले – OTT च्या जगात काहीतरी घडणार आहे. शाहरुख खानने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

शाहरुख खानच्या OTT पदार्पणाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. आर्यन खानच्या डेब्यूच्या बातम्या सतत चर्चेत असताना ही बातमी समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, किंग खानचा मुलगा आर्यन एका वेब सीरिजद्वारे लेखक म्हणून डेब्यू करणार आहे.असेही बोलले जात आहे की या प्रोजेक्टद्वारे किंग खान आपल्या मुलाचा डेब्यू करू शकतो.

मुलाला सिनेमात लॉन्च करणार असल्याचं समोर येताच शाहरुखचं आर्यनचे नशीब आता बदलणार असल्याचं बोललं जात आहे.

ड्रग्ज केस नंतर आता त्याला ओटीटीच्या माध्यमातून लोकांसमोर आणून तो आर्यनच्या फिल्मी करिअरची सुरुवात करण्याचा प्रयत्न करत असल्याची देखील चर्चा होत आहे.