भर रस्त्यात अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार, व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ

 सेलेब्स अनेकदा घरातून बाहेर पडताच पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होतात

Updated: Mar 15, 2022, 03:51 PM IST
 भर रस्त्यात अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार, व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ title=

मुंबई : सेलेब्स अनेकदा घरातून बाहेर पडताच पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होतात. यानंतर, फोटोंमधील सेलेब्सचे लूक आणि व्हिडिओंमध्ये त्यांची स्टाईल खूप चर्चेत येते. असाच एक व्हिडिओ आता अभिनेत्री दिशा परमारचा समोर आला आहे. खरंतर होळी तोंडावर आली आहे.  अशा स्थितीत सगळीकडे  रंग पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत दिशासोबत नुकताच तिच्या चाहत्यांनी प्रँक केला.

जोरात ओरडून पळू लागली दिशा
दिशा परमारला अलीकडेच मुंबईत पापाराझींनी स्पॉट केलं आणि सर्वांनी तिचे फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. अशा स्थितीत होळी साजरी करण्यासाठी तिथेच लोकही जमली होती. पापाराझींना पोज देताना काही लोकं मागून जोरात ओरडली हे ऐकताच दिशा खूप घाबरली. यानंतर दिशा जोर-जोरात ओरडू लागली आणि तिथून पळून तिच्या गाडीकडे गेली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

होळीच्या शुभेच्छा
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिशाही त्या लोकांना रंग लावण्यास नाकार देताना दिसत आहे. तिच्या क्यूटनेससाठी ओळखली जाणारी दिशा तिच्या कारमध्ये बसण्याआधी सर्वांना होळीच्या शुभेच्छा देताना दिसली. यासोबतच तिने यावेळी पापाराझींशीही संवाद साधला. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा परमारने आपल्या अभिनयाने करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यार' या टीव्ही सीरियलमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.