राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानचा या वर्षातील हा तिसरा सिनेमा असून या सिनेमाला खूप पसंती मिळत आहे. शाहरुख खानचा 'डंकी' हा सिनेमा शुक्रवारशिवाय प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करत आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी 30 कोटींची कमाई केली होती. हा सिनेमा भारतातील 'पठाण' आणि 'जवान'चे रेकॉर्ड मोडू शकला नसला तरी या चित्रपटाला आणखी दोन देशांमधून भरभरून प्रेम मिळत आहे.
शाहरुख खानच्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी 30 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीही या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. दुसऱ्याच दिवशी या सिनेमाची प्रभासच्या बहुप्रतिक्षित 'सलार'शी टक्कर झाली, मात्र त्यानंतरही या सिनेमाला शाहरुखच्या चाहत्यांचे प्रेम मिळत आहे.
शाहरुख खानचा 'पठान' वर्ष 2023 च्या सुरुवातीला सुपर-डुपर हिट ठरला होता आणि त्यानंतर 'जवान' या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. आता किंग खान राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' सिनेमागृहात दाखल झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 30 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्याच दिवशी 'डंकी'ची प्रभासच्या 'सलार'शी टक्कर झाली. सॅकनिल्कच्या प्राथमिक माहितीनुसार, 'डंकी'च्या रिलीजच्या दुसऱ्या दिवसाची कमाई चांगली आहे.
'डंकी'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी जवळपास 20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह 'डंकी'चे दोन दिवसांचे एकूण कलेक्शन आता 49.20 कोटी रुपये झाले आहे. या सिनेमाला परदेशात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर 'डंकी'ने जगभरात 58 कोटी रुपये कमावले आहेत.
प्रेम, मैत्री आणि मातृभूमीसाठी तळमळलेल्या एका अनिवासी भारतीयाचा भावनिक प्रवास या विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या या सिनेमाला देशाबरोबरच परदेशातही प्रेम मिळत आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या प्रेक्षकांकडून या चित्रपटाला विशेष पसंती मिळत आहे. या सिनेमाला दोन्ही देशातील प्रेक्षकांचा उदंड पाठिंबा मिळत आहे.
कामकाजाच्या दिवशी प्रदर्शित होऊनही शाहरुख खानच्या 'डंकी'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. लाँग वीकेंडचा फायदा शाहरुखच्या चित्रपटाला होईल, अशी अपेक्षा आहे. या वर्षातील हा पहिला नॉन-अॅक्शन चित्रपट आहे, ज्याने 29.2 कोटी रुपयांसह देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर पदार्पण केले आहे.