गाडीतून उतरताना सलमाननं खिश्यात ठेवला ग्लास, सलमानच्या 'त्या' व्हिडीओची चर्चा

Salman Khan Viral Video : सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत सलमानं चक्क हातात असलेला ग्लास खिश्यात ठेवताना दिसतोय.

दिक्षा पाटील | Updated: Dec 23, 2023, 12:35 PM IST
गाडीतून उतरताना सलमाननं खिश्यात ठेवला ग्लास, सलमानच्या 'त्या' व्हिडीओची चर्चा title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan Viral Video : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खानचे लाखो चाहते आहेत. त्याला स्क्रिनवर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत. जे त्यांच्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. त्यापैकी एक सलमान खान आहे. जेव्हापण सलमान हा बाहेर पडतो तेव्हा त्याच्या हटके स्टाईलनं सगळ्यांचे लक्ष वेधतो. नुकताच तो एका ठिकाणी स्पॉट झाला आणि त्यावेळी त्याच्या हातात असलेला ग्लास त्यानं थेट त्याच्या खिशात ठेवला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. शिवाय त्यावर नेटकरी विविध कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. 

नुकताच सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या व्हिडीओत सलमान मुंबईच्या अकीना पोहोचला होता. त्याचाच एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याच्या गाडीतून बाहेर पडत असताना सलमाननं निळ्या रंगाचं स्वेटशर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे. त्याला पाहताच त्याच्या आजूबाजूला लोक गर्दी करत असल्याचे पाहायला मिळते. त्यात सगळ्यांचं लक्ष ज्या गोष्टीनं वेधलं तो म्हणजे सलमानच्या हातात असलेला ड्रिंकचा ग्लास. त्याच्या हातात असलेला ड्रिंकचा ग्लास तो जिन्सच्या खिशात ठेवताना दिसला. त्यानं पापाराझी आणि चाहत्यांसाठी पोज दिली नाही आणि सरळ रेस्टॉरंटमध्ये गेला. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोच. नेटकऱ्यांनी त्यावर रिअॅक्शन देनं सुरु केलं आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं की 'लोक क्वार्टर बॉटलं अशी सोबत घेऊन जातात.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'जर तुम्हाला दारू पित असताना, हात खाली ठेवायचा असेल, तर हा एक उत्तम पर्याय आहे. पुढच्या वेळी मी नक्कीच हा प्रयोग करेन'. तिसरा नेटकरी म्हणाला की 'भाई इतका नशेत होता... त्यानं विचार केला की आपल्या खिशातचं संपूर्ण ग्लास नीट फीट करू शकतो आणि त्याला लपवू देखील शकतो.'

हेही वाचा : Bigg Boss 17 : नॅशनल टीव्हीवर विकी जैननं अंकितावर उचलला हात? स्पर्धकही शॉक

दरम्यान, असं याआधी तेव्हा झालं होतं जेव्हा सलमान खान, सनी देओलच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये पोहोचला होता. त्याचा असाच एक व्हिडीओ 19 जून 2023 मध्ये व्हायरल झाला होता. तेव्हा सलमान हा सनी देओलचा मुलगा करण देओलच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचला होता. त्याच्या स्टाईलनं त्यानं सगळ्यांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले होते. या व्हिडीओला पाहून लोकांनी अंदाज लावला होता की सलमान त्यावेळी नशेत होता.