VIDEO : कतरिनाच्या 'हुस्न परचम' अदांनी प्रेक्षक घायाळ

शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या तिघे 'जब तक है जान' या सिनेमानंतर पुन्हा एकत्र

Updated: Dec 12, 2018, 04:16 PM IST
VIDEO : कतरिनाच्या 'हुस्न परचम' अदांनी प्रेक्षक घायाळ  title=

मुंबई : शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या आगामी 'झिरो' या सिनेमातील 'हुस्न परचम' गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. अर्थातच पहिल्या ओळीप्रमाणे कतरिना या गाण्यात खूपच मोहक दिसतेय. कतरीना या सिनेमात पॉप स्टार बबीता कुमारीच्या भूमिकेत दिसणार आहे. बउआ (शाहरुख खान) बबिताच्या अदांनी घायाळ झालाय. 'हुस्न परचम' गाण्यात कतरिना हॉट आणि स्टायलिश लूकमध्ये दिसतेय. 

या सिनेमात शाहरुख 'बउआ'च्या भूमिकेत दिसणार आहे. तर अनुष्का शर्माही एका आव्हानात्मक भूमिकेत दिसतेय. हा सिनेमा येत्या २१ डिसेंबर रोजी प्रेक्षकांसमोर येतोय. 

या सिनेमाच्या निमित्तानं शाहरुख, कतरिना आणि अनुष्का या तिघे 'जब तक है जान' या सिनेमानंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत.