शाहरुखसोबत रोमान्स करणारी 'ही' अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात

This Famous Actress Get Married Second Time : शाहरूखसोबत या अभिनेत्रीनं काम केलं असून त्या दोघांमध्ये स्क्रिनवर दाखवण्यात आलेला रोमान्स हा चांगलाच चर्चेत होता. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 2, 2023, 11:11 AM IST
शाहरुखसोबत रोमान्स करणारी 'ही' अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात title=
(Photo Credit : Social Media)

Mahira Khan Get Married Second Time : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'रईस' या चित्रपटातील अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा विवाहबंधनात बंधनात अडकली आहे. सुरुवातीला फक्त एक चर्चा सुरु होती. पण आता खरंच हे सत्यात उतरलं आहे. माहिरानं सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले आहेत. माहिरानं तिचा बॉयफ्रेंड सलीम करीमसोबत विवाह केला. माहिरानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही व्हिडीओ शेअर केले आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

माहिराचा दुसरा विवाह

 माहिरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत पाहायला मिळत आहे ती माहिरानं पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. या सगळ्यात लक्ष वेधी गोष्ट ही माहिराची ओढणी आहे. तिची ही ओढणी खूप मोठी आहे. तर वरानं काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. ते दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. मात्र, त्या दोघांनी कुठे विवाह केला याविषयी काहीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. तिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देत शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

माहिराचा पहिला विवाह

माहिरा खानचं दुसरं लग्न हे 2007 मध्ये अली अक्सारीसोबत झालं होते. दोघांची भेट ही लॉस एंजेलिसमध्ये झाली होती. अली अक्सारी हा अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. 24 वर्षांची असताना माहिरा ही आई झाली होती. माहिराला एक मुलगा असून अजलान असं त्याचे नाव आहे. मात्र, 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तरी देखील मुलीची कस्टडी अजूनही माहिराकडे आहे. पहिला विवाह मोडल्यानंतर ती सगळ्यांपासून लांब राहत होती. अखेरीस तिला आता तिचा पार्टनर भेटला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे सलीम करीम?

सलीम करीम हा एक बिझनेसमॅन आहे. त्या दोघांनी धामधूमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं. त्याविषयी त्यांनी कोणालाही माहिती दिली नव्हती. फक्त जवळच्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी हा विवाह केला. रिपोर्ट्सनुसार, कपलनं पाकिस्तानमधील पंजाबमध्ये असलेलं एक हिल स्टेशन निवडलं. ते दोघे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : The Vaccine War फ्लॉप म्हणून फुकट तिकिटं वाटताय! विवेक अग्निहोत्री ट्रोल

माहिरा विषयी बोलायचे झाले तर शाहरुख खानच्या 'रईस' या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.