मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं, फार कमी कालावधीत ही मालिका लोकप्रिय ठरली. त्यात या मालिकेतील स्वीटू आणि ओम यांची जोडी प्रेक्षकांना फार आवडली.
आज या सर्व कलाकारांचं सोशल मीडियावर मोठं फॅन फॉलोविंग आहे. स्वीटू बऱ्याचदा सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत कनेक्टड राहण्याचा प्रयत्न करत असते. कधी डान्स व्हिडिओ तर कधी फोटो शेअर करत ती चाहत्यांसोबत संवाद साधते.
आता स्वीटूने शेअर केलेली पोस्ट सगळ्यांचच लक्षवेधून घेत आहे. स्वीटू अर्थात अभिनेत्री अन्विता फलटणकरने नुकतीच एक गाडी घेतली आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले जे कमी वेळातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
अन्विताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या पहिल्या वहिल्या गाडीचे फोटो पोस्ट केले आहेत. अन्विताने Hyundai ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीचे फोटो शेअर करत अन्विताने कॅप्शनमध्ये म्हटलंय, "पहिल्या गोष्टी नेहमीच खास असतात."
याचाच अर्थ अन्विताने खरेदी केलेली ही पहिली गाडी आहे. अन्विताच्या या पोस्टवर तिच्या सहकलाकारांपासून चाहत्यांपर्यंत सगळ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलं आहे. स्वीटूने हे गिफ्ट स्वत:ला देत आनंद सगळ्यांसोबत शेअर केला आहे.