आईच्या उपचारांसाठी अभिनेत्रीने इतरांपुढं पसरले हात

आर्थिक चणचण दूर करण्याचा प्रयत्न 

Updated: Jun 9, 2020, 04:46 PM IST
आईच्या उपचारांसाठी अभिनेत्रीने इतरांपुढं पसरले हात  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही दिवसांपूर्वीच एका टेलिव्हिजन अभननेत्यानं फेसबुकच्या माध्यमातून आपल्यावर सुरु असणाऱ्या उपचारांसाठी जाहीरपणे मदतीचं आवाहन केलं होतं, त्याचप्रमाणे आता एक टेलिव्हिजन अभिनेत्रीही क्राऊड फंडींगच्या मार्गाचा अवलंब करत तिची आर्थिक चणचण दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. 

आईवर उपचार सुरु असून, तिच्या उपचारासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचं वास्तव सर्वांपुढं मांडत नुपूरनं आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे. 

'अगले जनम मोहे बिटीया ही की जो',  'घर की लख्मी बेटियाँ' अशा अनेक मालिकांतून ती झळकली आहे. पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणाचा फटका तिलाही बसल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. बँक खातं गोठल्यामुळं डेबिट- क्रेडीट कार्डचं काम करणं बंदच होतं. अखेर तिच्यावर आपले दागिने विकण्याचीही वेळ आली. इतकंच नव्हे, तर तिला मित्रमंडळींकडूनही रक्कम उधार घ्यावी लागली होती. 

 

माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार नुपूरची आही  ILD या फुफ्फुसात्या आगारानं ग्रासलेली आहे. परिणामी त्यांना बेडरेस्टचाच सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्या उपचारांसाठी नुपूरला तब्बल सहा लाख रुपयांची गरज आहे. पण, इतरी मोठी रक्कम एकटीनं स्वबळावर उभी करणं शत्य नसल्यामुळं अखेर तिनं जाहीरपणे आर्खित मदतीसाठी आवाहन केलं आहे.