'माहेरची साडी'चा सिक्वल येणार

1991 साली रिलीज झालेल्या 'माहेरची साडी'या चित्रपटाने प्रेक्षकांवर अक्षरशः मोहिनी घातली होती. 

Updated: Jun 5, 2017, 11:21 PM IST
'माहेरची साडी'चा सिक्वल येणार  title=

मुंबई : 1991 साली रिलीज झालेल्या 'माहेरची साडी'या चित्रपटाने प्रेक्षकांवर अक्षरशः मोहिनी घातली होती. मराठी सिनेमाच्या इतिहासातली रेकॉर्डब्रेक 'माहेरची साडी' आता सिक्वेलच्या रुपात परत एकदा आपल्या भेटीला येत आहे. निर्माते विजय कोंडके यांनी या सिक्वेलची घोषणा केली आहे.

या चित्रपटाची पटकथा तयार असून कलाकार व तंत्रज्ञ यांची निवड होताच लवकरच चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. विजय कोंडके यांनी दिग्दर्शित केलेला ‘माहेरची साडी’ त्यावेळी मराठीतला ब्लॉकबास्टर सिनेमा ठरला होता.

तब्बल 12 कोटींची कमाई करणारा हा मराठीतील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. अभिनेत्री अलका कुबलला या चित्रपटाने लोकप्रियता मिळवून दिली होती. आजही अलका कुबल यांना या चित्रपटासाठीच ओळखले जाते. या सिनेमाच्या निमित्ताने अलका कुबल स्टाईल सिनेमांची लाटच इंडस्ट्रीत आली होती.

अलका कुबलला सुपरस्टार बनवण्यात माहेरची साडी या सिनेमाचा मोठा मोलाचा वाटा होता. भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्यावर आधारलेल्या या सिनेमात अलका कुबल, विक्रम गोखले, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, किशोरी शहाणे, रमेश भाटकर यासारख्या दिग्गज कलाकारांनी या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या.

आता याच सिनेमाचा सिक्वेल बनवण्याचा निर्मात्यांचा विचार आहे.पण तो काळ आणि आत्ताचा काळ वेगळा होता, त्यामुळे ही माहेरची साडी पुन्हा रसिकांना भूरळ घालते का याबद्दल जरा साशंकताचं आहे, पण तरीही निर्मात्यांनी या सिनेमाच्या सिक्वेलचा चंगचं बांधला आहे.

सिनेमाची कथा आणि पटकथा ठरली असून निर्माते सध्या कलाकारांच्या शोधात आहेत. अलका कुबलला रातोरात स्टार करणारी माहेरची साडी या सिनेमाचा सिक्वेल कोणात्या अभिनेत्रीच्या पदरात पडतो हे पाहाणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.